शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस व्हा: आमदार गणपत गायकवाड

By मुरलीधर भवार | Updated: October 10, 2022 14:27 IST

कल्याण पूर्वेतील ग्रामीण भागात मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु; आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार  

कल्याण : दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस व्हा असे आवाहन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस भरती प्रशिक्षणार्थीना केले. आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने श्रीमलंग गड पायथ्याशी नेवाळी गाव येथे विनामूल्य पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला 200 युवक युवतींनी सहभाग घेतला. यावेळी आमदारांनी देखील या विद्यार्थ्यासह ग्राउंडमध्ये धावत फेरी पूर्ण केली.

महाराष्ट्रात लवकरच २० हजार जागांसाठी पोलीस पदांची मेगा भरती होणार असल्याने कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त युवक-युवतींचा या पोलिस भरती प्रक्रिया मध्ये समावेश व्हावा या हेतून हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. पोलीस भरती म्हटल्यानंतर बऱ्याच युवक युतींना या संदर्भात पुरेशी माहिती नसते तसेच मैदानी प्रशिक्षण याबाबत कल्पना नसते त्या अनुषंगानेच प्रशिक्षण वर्गामध्ये युवक युवतींना पूर्ण प्रशिक्षण आणि लेखी परीक्षा साठी मार्गदर्शन करून त्यांची सर्व तयारी करून पोलीस भरतीसाठी त्यांना पात्र होण्यासाठी पूर्ण सहकार्य आणि प्रशिक्षण दिले जाईल. या विनामूल्य पोलीस भरती प्रशिक्षण वर्गामध्ये अनेक तज्ञ प्रशिक्षक आणि अनुभवी शिक्षक  यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले. 

तर अनेकवेळा पोलीस भरती दरम्यान काही दलाल लोकं या इच्छुकांकडून भरती करून देण्यासाठी पैसे घेत असतात. मात्र आताचे सरकार कोणताही भ्रष्टाचार करत नाही आणि करणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना ५ वर्षात कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाला नाही. फडणवीस यांनी त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अथवा इतर कोणत्याही बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला नाही. त्यामुळे या पोलीस भरतीत कधीच भ्रष्टाचार होणार नाही. मात्र काही भोंदू लोकं १००, २०० लोकांचे पैसे घेऊन १०, २० लोकं भरती झाल्यावर आपण सेटिंग लावून भरती करून दिलं असं खोटं सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा दलालांच्या भूलथापांना बळी न पडता शारीरिक आणि बौद्धिक मेहनतीच्या जोरावर पोलीस व्हावे असे आवाहन आमदार गणपत गायकवाड यांनी  केले.   या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे मलंगगड विभाग अध्यक्ष राजेंद्र वारे,  जि.प. सदस्य श्याम पाटील, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे,  जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी,  ओबीसी मोर्चा अध्यक्ष निलेश म्हात्रे,  युवा अध्यक्ष समीर भंडारी,  जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मढवी, समाजसेवक प्रकाश दुतकर,  ज्येष्ठ नेते गोटीराम पाटील,  नेवाळीगाव सरपंच पूजा जाधव  तसेच  भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kalyanकल्याण