शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त डिझेल विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश;पाच अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 01:26 IST

कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई : ३० लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

कल्याण : भेसळयुक्त डिझेलचा साठा आणि विक्री करणाऱ्या टोळीचा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. आडीवली गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या गाळ्यात गुरुवारी टाकलेल्या छाप्यात सुमारे १२ हजार लीटर भेसळयुक्त डिझेल जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ३० लाख ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.मानपाडा परिसरातील आडवली गावात काही व्यक्ती बेकायदा मिनीरल टर्पेंटाइन ऑइल व बेस ऑइल यांच्या मिश्रणात रासायनिक रंग मिसळून भेसळयुक्त बायोडिझेलची विक्री करीत आहेत, अशी माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार ठाणे शिधावाटप उपनियंत्रक कार्यालयाचे पुरवठा अधिकारी एकनाथ पवार, राजेश पाटणकर, राजेश सोनार यांनी बुधवारी पहाटे छापा टाकला असता त्या ठिकाणी पाच व्यक्ती गाळ्यातील ५ हजार लीटर क्षमतेच्या एकूण ८ टाक्या एकमेकांना पी.यू.सी. पाइपद्वारे जोडून त्यामध्ये मिनिरल टर्पेंटाइन ऑइल, बेस ऑइल व नारंगी रंगाचे रसायन द्रव यांचे मिश्रण करून भेसळयुक्त बायोडिझेल निर्मिती करीत असताना आढळल्या. गाळ्यातील टाक्यातून इलेक्ट्रिक मोटारद्वारे भेसळयुक्त बायोडिझेल टँकर आणि पिकअप वाहनातील टाक्यांमध्ये विक्री करता भरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. भेसळयुक्त डिझेलसह अन्य रसायन आणि दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.आरोपींना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी  पवन यादव, कृष्णा शुक्ला, रोहन शेलार, पंकज सिंग, विपुल वाघमारे ही या प्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. त्यांना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगून, मारुती दिघे, शरद पंजे, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, विलास मालशेटे, सचिन साळवी यांसह अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.बारा हजार लीटर भेसळयुक्त तेल जप्त  आडीवली गावात बांधकाम सुरू असलेल्या गाळ्यात टाकलेल्या छाप्यात १२ हजार लीटर भेसळयुक्त डिझेल जप्त करण्यात आले.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल