शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मूर्ती विक्रेत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; डोक्याला दुखापत

By मुरलीधर भवार | Updated: August 21, 2023 21:27 IST

त्याच्या गरोदर पत्नीला देखील केली धक्काबुक्की आणि शिवीगाळ

कल्याण-तुला या जागेवर स्टोल लावायचा असेल तर मला पैसे दे अशी मागणी करत गणेश मूर्ती विक्रेत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण खडकपाडा परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली.

कल्पेश आर्या असे जखमी विक्रेत्याचे नाव आहे. कल्पेशवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या राजेश केणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.खडकपाडा परिसरात कल्पेश आर्या हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. गणेश उत्सवासाठी कल्पेश खडकपाडा परिसरात स्टॉल लावून गणेश मुर्त्या विक्री करतो. यंदा देखील त्याने खडकपाडा परिसरात गणेश मूर्ती विक्री करण्याचा स्टॉल लावला आहे. काल रात्री राजेश केणे नावाचा इसम त्याच्या स्टॉलवर आला. तुला इथे स्टॉल लावायचा असेल तर मला पैसे दे असे म्हणत पैशांची मागणी सुरू केली.

कल्पेशने ज्यांची जागा आहे त्यांना पैसे देतो असे सांगत पैसे देण्यास नकार दिला. संतापलेल्या राजेश केणे याने शिवीगाळ करत लोखंडी रॉडने कल्पेशला मारहाण केली. इतकेच नव्हे तर कल्पेशला वाचवण्यासाठी त्याची गरोदर पत्नी पुढे आली. तिला देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या मारहाणीत कल्पेशला गंभीर दुखापत झाली आहे.