शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृतीची पायाभरणी

By प्रशांत माने | Updated: January 7, 2024 18:03 IST

श्रीराम मंदिर उभे राहणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंद, अभिमानाचा क्षण - खासदार श्रीकांत शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण: देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ५०० वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे राहत आहे. हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंद आणि अभिमानाचा क्षण असणार असल्याची भावना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण पूर्वेमध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. याच्या पायाभरणी सोहळयामध्ये शिंदे बोलत होते.

२२ जानेवारीला आयोधेमध्ये प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार असून देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. मात्र प्रत्येक भक्ताला तिकडे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका स्थित गुण गोपाल मैदानात श्रीराम मंदिराची ही भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याचे शिंदे म्हणाले. कल्याण डोंबिवलीतील रामभक्तांनी याठिकाण येऊन दर्शन घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.शिंदे पुढे म्हणाले प्रभू श्रीराम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त ज्याप्रकारे अयोध्येत उत्साह असेल अगदी तसाच उत्साह याठिकाणी साजरा केला जाईल. पुढील आठवडाभर याठिकाणी गीत रामायण, हरिपाठ यांसारखे अनेक धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले आहेत. कला दिग्दर्शक अमन विधाते ही प्रतिकृती साकारणार आहेत अशी माहीती खासदार शिंदे यांनी दिली.

‘ती’ देणगी महाराष्ट्रातील करोडो रामभक्तांच्या वतीने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्ष, आणि महाराष्ट्रातील तमाम रामभक्तांच्या वतीने एक छोटेसे योगदान म्हणून अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टला आपण ११ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे खासदार शिंदे यावेळी म्हणाले. राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी प्राणाची आहुती दिली आहे. अनेकांनी संघर्ष केला आहे. बाळासाहेबांनी राम मंदिराचे स्वप्न पाहिले होते, करोडो रामभक्तांनी या राम मंदिराचे स्वप्न पाहिले होते. राम मंदिरासाठी मोठा लढा लढणारे चंपत राय यांच्याकडे ही देणगी आपण सुपूर्द केल्याचे शिंदे यांनी सांगितले.