शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

किल्लेबांधणी स्पर्धेमध्ये किल्ला विजयदुर्गने पटकाविला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 23:50 IST

जाणता राजा युवा प्रतिष्ठानची बाजी

n  लोकमत न्यूज नेटवर्कडाेंबिवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे महत्त्व, पावित्र्य व इतिहासातील मराठ्यांच्या योगदानाचे महत्त्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे व गडकोटांची आवड त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून फक्त राजे प्रतिष्ठानतर्फे किल्लेबांधणी स्पर्धा २०२० चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी सागाव येथे पार पडला. जाणता राजा युवा प्रतिष्ठानने साकारलेली विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

किल्लेबांधणी स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. फक्त राजे प्रतिष्ठान, सांगावेशवर मंडळ, शिवप्रलय लाठीकाठी संस्कारवर्ग, शिवसाधना समूह डोंबिवली, आयकॉन प्रतिष्ठान, जाणता प्रतिष्ठान ठाकुर्ली, हिंदवी स्वराज्य ग्रुप, राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आदींनी पारितोषिक सोहळा आणि व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किल्ले स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक नवयुग मित्रमंडळाने साकारलेल्या उंदेरी- खांदेरी या किल्ल्याच्या प्रतिकिृतीला मिळाला. तर, तृतीय क्रमांक दत्तनगर बॉइज यांच्या किल्ला मल्हारगड, चतुर्थ क्रमांक ओम निवास सो. ग्रुपच्या किल्ला विजयदुर्ग, पाचवा क्रमांक स्वामी विवेकानंद सो. ग्रुपच्या विजयदुर्ग किल्ला प्रतिकृतीला मिळाला. कार्यक्रमाला कर्ण जाधव, लक्ष्मण मिसाळ, सुरज म्हात्रे, प्रतीक पाटील, प्रवीण देवडा आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी प्रकल्प चव्हाण, अश्विन पवार, वैभव बोलीये, शुभम वारेशी, श्रीनिवास वांगडे, चैताली चव्हाण, श्रद्धा पाटील, मृणाली मोहिते, विशाखा राणे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

बालकलाकारांनाही प्राेत्साहनकिल्लेबांधणी स्पर्धेत बालकलाकारांनीही सहभाग घेतला होता. पुढच्या वर्षी त्यांना किल्ले बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळावे, या हेतूने आयोजकांच्या वतीने सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात लाठीकाठी, तलवारीचे प्रात्यक्षिक सादरीकरण झाले. तसेच देव-देश-धर्म-धर्मशिक्षण, हिंदू संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची तरुण पिढी यावर शिल्पकार गुणेश अडवळ यांचे व्याख्यानही झाले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली