शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी भाजपला दिली सोडचिट्टी

By मुरलीधर भवार | Updated: January 16, 2024 16:16 IST

पत्नी कविता म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी यांचाही राजीनामा

डोंबिवली-कल्याण डाेंबिवली महापालिका माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांच्यासह दोनप्रभागातील कार्यकर्ते पदाधिकाऱ््यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर म्हात्रे यांचा राजीनामा हा चर्चेचा विषय ठरला आहे. म्हात्रे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन भाजपला धक्का दिला आहे. त्यामुळे विकास म्हात्रे आत्ता कोणत्या राजकीय पक्षाची कास धरणार या विषयावर चर्चा सुरु झाली आहे.

कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांची शिवसेना शिंदे गटा सोबत धूसफूस सुरु आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर विकास म्हात्रे यांचा राजीनामा हा लक्षवेधी ठरला आहे. म्हात्रे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे म्हात्रे यांचा राजीनामा हा चव्हाण यांना देखील धक्का देणारा ठरला आहे. म्हात्रे यांच्या प्रभागात रस्ते विकासाची कामे केली जात नाही. त्यासाठी निधीची मागणी करुन देखील निधी उपलब्ध होत नाहीत. याविषयी म्हात्रे यांनी वारंवार खंत व्यक्त केली होती.

म्हात्रे यांनी पक्ष सदस्य पदाच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, राजूनगर आणि गरीबाचा वाडा प्रभागात अपुऱ््या निधीमुळे विकास खुंटला आहे. वारंवार पत्रव्यवहार करुन देखील दखल घेतली जात नाही. अनेक रस्त्याची कामे अपुरी आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरीकांमध्ये आमच्या विरोधात असंतोष आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ््यांना ही नागरीकांच्या रोषाला सामाेरे जावे लागते. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाप्रति नाराज झाले आहे. प्रभागातील नागरीक उघडपणे बोलू लागले आहेत की इतर प्रभागात विकास कामे झपाट्याने होत आहेत.

आपल्या पक्षाचे केंद्रात आणि राज्यात सरकार असताना आपल्या प्रभागाचा विकास का होत नाही. अनियमित पाणी पुरवठयाची समस्या आहे. त्याविषयी वरिष्ठांकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करुन अद्याप दखल घेतली गेली नाही अशा अनेक समस्या नागरीकांना भेडसावत आहेत. त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कमी पडत आहोत. त्यामुळे मी, माझी पत्नी कविता आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा देत आहोत. हा राजीनामा त्यांनी भाजप पश्चिम मंडळ अध्यक्षाकडे दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका