शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

KDMC च्या टिटवाळ्यातील प्रसूतीगृहात रुग्णाला रुग्णवाहिका मिळण्यास पाच तासाचा विलंब

By मुरलीधर भवार | Updated: December 13, 2024 19:53 IST

प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी मुंबईला हलविण्याकरीता हवी होती रुग्णवाहिका

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा या प्रसूतीगृहात एका महिलेची प्रसूती झाल्यावर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्याकरीता रुग्णवाहिका हवी होती. रुग्णवाहिका पाच तासाच्या विलंबाने उपलब्ध झाली आहे. याप्रकरणी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याने तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

नेमके काय घडले?

महापालिकेच्या टिटवाळा येथील प्रसूतीगृहात प्रसूतीसाठी वैदेही मुंडे दाखल झाल्या होत्या. त्यांची प्रसूती झाली. त्यांनी एका बाळाला जन्म दिला. त्यांच्या बाळाची प्रकृती ठीक नसल्याने बाळाला उपचारासाठी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र बाळाची आई वैदेही यांचीही प्रकृती ठिक नसल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. त्यासाठी रुग्णाहिका उपलब्ध नव्हती. तब्बल पाच तासानंतर ती रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्याचबरोबर याच रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या चैताली भंडारे यांची प्रसूती करण्यातही डॉक्टरांनी विलंब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन प्रसूतीचा सल्ला दिला होता. त्या त्यासाठी तयार नसल्याने प्रसूती उशिराने शस्त्रक्रियेद्वारेच करण्यात आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी आक्रमक

घडलेला प्रकार कळताच शिंदेसेनेचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेच्या कारभारावर टीका केली. रुग्णवाहिका पाच तासानंतर उपलब्ध झाली. त्या महिलेच्या जिवाला दगाफटका होऊ शकला असता. महापालिकेने आरोग्य सेवा वेळीच सुधारली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देशेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला. उद्धवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनीही या प्रकरणी तीव्र भूमिका मांडली. अधिकाऱ्यांनाच या रुग्णालयात अँडमिट करावे लागेल, तेव्हा या रुग्णालयांच्या आरोग्य सेवा सुधारतील, अशी खोचक टीका त्यांनी केली.

या प्रकरणी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, महापालिकेकडून रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यास विलंब झाला. मात्र महिलेला मुंबईतील रुग्णालयात पाठविले आहे. त्याचबरोबर अन्य एका महिलेची प्रसूती देखील करण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या १४ रुग्णवाहिका आहे. त्यापैकी एक रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. आणखीन ९ रुग्णवाहिका खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकर ९ रुग्णवाहिका दाखल होती. त्यामुळे रुग्णवाहिकांची एकूण संख्या लवकरच २३ इतकी होईल.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाhospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिलाShiv Senaशिवसेना