शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या तुलनेत रुग्ण कमीच; दुसऱ्या लाटेची शक्यता, केडीएमसीची आरोग्य यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 01:01 IST

जूनपासून अनलॉक सुरू झाले. त्यानंतर गणेशोत्सवात नागरिकांनी खूपच सूट घेतली. त्याचाच परिणाम म्हणून गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली होती.

मुरलीधर भवार/ सदानंद नाईक कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येने जुलैमध्ये उच्चांक गाठला होता. पुढे गणेशोत्सवात नागरिक एकत्र आले. त्यामुळे या उत्सवानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. मात्र, दिवाळीनंतर आता तितक्या वेगाने रुग्णसंख्या वाढताना दिसत नाही. सध्या दररोज २०० च्या आतच रुग्ण आढळत असल्याने ही रुग्णसंख्या स्थिरावल्याचा दावा केडीएमसीच्या आरोग्य विभागाने केला आहे. दरम्यान, डिसेंबरअखेरपर्यंत दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्याकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात येत आहे.

जूनपासून अनलॉक सुरू झाले. त्यानंतर गणेशोत्सवात नागरिकांनी खूपच सूट घेतली. त्याचाच परिणाम म्हणून गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली होती. दिवसाला कोरोनाचे किमान ४०० नवे रुग्ण आढळत होते. काही वेळेस तर ही संख्या ४८५ पर्यंत गेली होती. कल्याण पश्चिमेतील जोशी बागेतील एका इमारतीतील एकाच कुटुंबातील ३३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. कारण, हे कुटुंब गणेशोत्सवात एकत्र आले होते. त्यामुळे दिवाळीतही असेच चित्र पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, प्रत्यक्षात दिवाळीनंतर दररोज १५० ते २०० च्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. ही बाब निश्चितच दिलासा देणारी आहे.

उल्हासनगरात दुसऱ्या लाटेची शक्यता फेटाळली 

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी सांगितले. दुसरी लाट आल्यास महापालिका यंत्रणा सक्षम असून त्यासाठी प्लॅटिनम हॉस्पिटल सज्ज ठेवणार असल्याचे संकेत महापालिका आरोग्य विभागाने दिले.

उल्हासनगरात शनिवारी कोरोना रुग्णांची एकूण संख्या १० हजार ७७६ असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४७ टक्के आहे. एकूण ३५४ जणांचा मृत्यू झाला. आजमितीस एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४२ आहे. एकूण १० हजार १८० रुग्ण बरे झाले असल्याचे रिजवानी यांनी सांगितले. शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता सध्या तरी त्यांनी फेटाळून लावली. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर महापालिकांत रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगून त्यांनी चिंता व्यक्त केली. शहरात प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका