शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी स्पर्धांमध्ये फी वाढीचा खेळाडूंना फटका, स्पर्धेत प्रवेश न घेण्याचा अनेक शाळांचा निर्णय

By मुरलीधर भवार | Updated: October 14, 2022 14:54 IST

मुरलीधर भवार- कल्याण कल्याण -कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा आयोजन करण्यात येते. परंतु त्याआधी जिल्हा क्रीडा अधिकारी ...

मुरलीधर भवार-कल्याण

कल्याण-कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचा आयोजन करण्यात येते. परंतु त्याआधी जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांच्याकडे महानगर परिसरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय या खेळाडूंची वार्षिक फी भरावी लागते. ती आजपर्यंत कमी होती परंतु यावर्षी दुप्पट करण्यात आल्यामुळे शाळा मुख्याध्यापक, प्राचार्य आणि क्रीडा शिक्षक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. फक्त ठाणे विभागात फी वाढवली असल्यामुळे शिक्षकांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे. विद्यार्थ्यांना ,पालकांना, शाळा यांना फी चा नाहक भुर्दंड भरावा लागत आहे. या वाढलेल्या फीजमुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज खेळाडू स्पर्धेपासून वंचित राहणार आहेत.

कोरोना महामारी नंतर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू फी कमी आहे किंवा माफ केली जात असताना ठाणे विभागात विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंची फी वाढवून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे.त्यामुळे गरीब व होतकरू खेळाडूंनी शालेय स्पर्धांमध्ये भाग घेऊ नये, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे धोरण दिसत आहे.

वाढलेल्या फीजमुळे अनेक शाळांनी स्पर्धेमध्ये प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे शाळेतील खेळाडूंचे खूप मोठे नुकसान होणार आहे. या वाढलेल्या विरोधात कल्याण डोंबिवलीतील क्रीडा शिक्षक एकत्र आले असून त्यांनी मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांनाही मेल केले आहेत. तसेच कल्याण तालुका शारीरिक शिक्षण मंडळातर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले आहेवाढलेल्या फीस मुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक खेळाडूंचे खूप मोठे नुकसान होणार असून या वाटलेल्या फिस मुळे अनेक शाळा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार नाहीत. त्यामुळे खेळाडू स्पर्धेच्या बाहेर जाणार आहेत. क्रीडा क्षेत्राचे खूप मोठे नुकसान होणार आहे.लक्ष्मण इंगळे अध्यक्ष, कल्याण तालुका शारीरिक क्रीडा संघटना                                    मुंबई विभागामध्ये फक्त ठाणे जिल्ह्याची फीस वाढवण्यात आली असून ठाणे जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष फिस वाढ झालेली नव्हती आणि शासनाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये पंच स्पर्धा आणि बाकीचा जो काही खर्च आहे. तो वाढला असल्यामुळे यावर्षी थोडीफार फीज वाढवण्यात आलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये ८० ते ९० टक्के शाळांनी फीज भरून झालेली आहे त्यामुळे कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्नेहल साळुंखे,जिल्हा क्रीडा अधिकारी                                    

शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये जे काय फीज वाढीचा माझ्याकडे तक्रारी आलेला आहेत. त्या संदर्भात मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांना पत्रक पाठवले आहे आणि वाढलेल्या फिस बाबत विचारणा केली आहे मला त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. स्नेहा करपे,सहाय्यक आयुक्त तथा नोडल क्रीडा अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली