शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूपेक्षाही बेघर होण्याची भीती अधिक; धोकादायक इमारती करत नाहीत स्ट्रक्चरल ऑडिट 

By मुरलीधर भवार | Updated: May 21, 2025 15:07 IST

कल्याण : कल्याण -डोंबिवली महापालिका हद्दीत ५१३ धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतीमधील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची कुठलीही व्यवस्था ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ५१३ धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतीमधील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची कुठलीही व्यवस्था नाही हेच दारुण वास्तव कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा येथील सप्तशृंगी या धोकादायक इमारतीच्या दुर्घटनेतून अधोरेखित झाले. पालिकेने एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अतिधोकादायक इमारतींची संख्या १६९ आहे, तर धोकादायक इमारतींची संख्या २९३ आहे. अतिधोकादायक इमारती महापालिकेकडून पाडण्यात येतात. मात्र त्यामधील घरे लोकांनी सोडली नाहीत तर त्या पाडण्यात अडचणी येतात. धोकादायक इमारतींना पालिकेच्या प्रभाग कार्यालयाकडून नोटिसा पाठविल्या जातात. या इमारती पावसाळ्यापूर्वी रहिवासमुक्त कराव्यात अथवा स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे नाेटीसमध्ये सूचित असते. दुर्घटनाग्रस्त सप्तशृंगी इमारतीलाही पालिकेने धोकादायक इमारतीची नोटीस बजावली होती व स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. ऑडिटमध्ये इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आला तर जायचे कुठे,  असा प्रश्न रहिवाशांना भेडसावतो. घर सोडायला लागण्याच्या भीतीपोटी स्ट्रक्चरल ऑडिट टाळण्याकडे नागरिकांचा कल असतो. धोकादायक इमारतीचा पुनर्विकासासाठी पालिकेच्या नगररचना खात्याकडून परवानगी दिली जाते. मात्र जागामालक, भाडेकरू आणि बिल्डर यांच्यात एकमत होत नाही. त्यामुळे पुनर्विकासाच्या प्रस्तावांना प्रतिसाद मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यकाळात धाेकादायक इमारती पाडण्याच्या कामाला वेग आला होता. त्यामुळे अशा इमारतींची संख्या कमी झाली होती. 

क्लस्टरचे घोंगडे भिजत २०१५ मध्ये ठाकुर्लीतील ‘मातृछाया सदन’ ही इमारत पडली. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता क्लस्टर योजना राबविली जाईल, असे म्हटले होते. पालिकेने क्लस्टर योजनेचा प्लान तयार केला. क्लस्टर योजना ४१ ठिकाणी राबविली जाणार आहे. त्यापैकी कल्याण कोळसेवाडी आणि डोंबिवली आयरे दत्तनगर परिसरात प्रथम राबविली जाणार आहे. त्यासाठी १० कोटी मोजून बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी कंत्राटदार नेमला. कल्याण-कोळसेवाडीचे सर्वेक्षण ९० टक्के झाले. मात्र डोंबिवली आयरे दत्तनगर परिसरातील सर्वेक्षणाचे काम ४० टक्के झाले. सर्वेक्षणाचे काम थांबल्याने कंपनीचा ठेका  रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. 

पालिका काय करणार?डोंबिवलीतील आयरे परिसरात ‘आदिनारायण’ ही धोकादायक इमारत २०२३ मध्ये पडल्याने दोन जणांचा मृ्त्यू झाला. त्याच घटनेची पुनरावृत्ती मंगळवारी कल्याण पूर्वेत घडली.  यामध्ये सहा जणांचा जीव गेला. आता महापालिका काय पावले उचलते याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका