शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कर्मचाऱ्यांसाठीचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात, दीड हजार जणांचा सहभाग

By अनिकेत घमंडी | Updated: February 13, 2024 16:25 IST

जवळपास दीड हजार कर्मचारी व कुटुंबियांनी या स्नेहमेळाव्यात सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

डोंबिवली: अत्यावश्यक सेवेतील वीज कर्मचाऱ्यांना रोजच्या ताण-तणावातून कांही क्षण विरंगुळा मिळावा या उद्देशातून महावितरणकडून वर्षातून दोनदा कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार कोंकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल तसेच कल्याण एक आणि दोन मंडल कार्यालयांतर्गत कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी उंबर्डे येथील गावदेवी क्रीडांगणात  आयोजित कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. जवळपास दीड हजार कर्मचारी व कुटुंबियांनी या स्नेहमेळाव्यात सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून स्नेहमेळाव्यात व्यावसायिेक कार्यक्रमाऐवजी महावितरणचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कला-गुणांना संधी देण्यात आली. त्यांच्या या संकल्पनेला मूर्त रूप देताना कर्मचारी आणि कुटुंबियांनीही व्यावसायिक कार्यक्रमाच्या तोडीच्या सादरीकरणाने उपस्थितांना खिळवून ठेवले. या कार्यक्रमात जवळपास १५० कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी विविध मराठी-हिंदी गिते, अभिनय, नाटिका आणि कला सादर केल्या. 

कल्याण परिमंडलाकडून मुख्य अभियंता औंढेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागातून ‘शोले’ सिनेमाच्या धर्तीवर सादर केलेल्या नाट्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. तर कल्याण मंडल एककडून अधीक्षक अभियंता दीपक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण आणि ७ रौप्य पदकांची कमाई करणाऱ्या कल्याण-रत्नागिरी परिमंडल संयुक्त संघातील खेळाडूंचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते अनिल घोगरे, निलकमल चौधरी, दीपक पाटील, दिलीप भोळे, विजय मोरे, संदीप पाटील, महेश अंचिनमाने, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप महाव्यवस्थापक योगेश खैरनार यांच्यासह नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, अधिकारी, अभियंते व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरिष्ठ व्यवस्थापक निलेश भवर, शशिकांत पोफळीकर, व्यवस्थापक योगेश अमृतकर, सर्व कार्यकारी अभियंते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिरिक्त कार्यकारी अभियंता कांतिलाल पाटील आणि उपव्यवस्थापक राधिका पवार यांनी केले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली