शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भेसळयुक्त डिझेल विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 5 जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:54 IST

आडीवलीत कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई

कल्याण:  भेसळयुक्त डिझेलचा साठा आणि विक्री करणा-या टोळीचा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. आडीवली गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या गाळयात टाकलेल्या छाप्यात सुमारे 12 हजार लिटर भेसळयुक्त डिझेल जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 30 लाख 86 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मानपाडा परिसरातील आडवली गावात काही व्यक्ती बेकायदेशीरपणो मिनिरल टरपेंट ऑईल व बेस ऑईल यांचे मिश्रण करून त्यामध्ये रासायनिक रंग मिसळुन भेसळयुक्त बायो डिझेलची निर्मिती व साठा करून त्याची विक्री करीत आहेत अशी माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजु जॉन यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार ठाणो शिधावाटप उपनियंत्रक कार्यालयाचे पुरवठा अधिकारी एकनाथ पवार, राजेश पाटणकर, राजेश सोनार यांच्यासह संबंधित ठिकाणी बुधवारी पहाटे छापा टाकला असता त्याठिकाणी पाच व्यक्ती गाळयातील 5 हजार लिटर क्षमतेच्या एकुण 8 टाक्या एकमेकांना पी.यु.सी पाईपद्वारे जोडुन त्यामध्ये मिनिरल टर्पेंट ऑईल, बेस ऑईल व नारंगी रंगाचे रसायन द्रव यांचे मिश्रण करून भेसळयुक्त बायो डिझेल निर्मिती करीत असताना आढळुन आल्या.

गाळयातील टाक्यातून इलेक्ट्रिक मोटारद्वारे भेसळयुक्त बायो डिझेल टँकर आणि पिकअप वाहनातील टाक्यांमध्ये विक्री करता भर असताना निदर्शनास पडले. भेसळयुक्त डिझेलसह अन्य रसायन आणि दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. पवन यादव, कृष्णा शुक्ला, रोहन शेलार, पंकज सिंग, विपुल वाघमारे अशी पाच अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना गुरूवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 डिसेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरिक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरिक्षक नितीन मुदगून, मारूती दिघे, शरद पंजे, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, विलास मालशेटे, नरेश जोगमार्गे, अरविंद पवार, प्रकाश पाटील, सचिन साळवी  यांसह अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Policeपोलिस