शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील १२ मोठ्या उद्योगांचा गुजरातला विस्तार, जागेची कमतरता; मूलभूत सोयीसुविधांमुळे पसंती 

By मुरलीधर भवार | Updated: November 8, 2022 08:28 IST

डोंबिवली औद्योगिक वसाहतीत ४२० पेक्षा जास्त कंपन्या विविध उत्पादने घेत असून जागेअभावी येथील १२ मोठ्या उद्योगांचा गुजरातला विस्तार होत आहे.

डोंबिवली :

डोंबिवली औद्योगिक वसाहतीत ४२० पेक्षा जास्त कंपन्या विविध उत्पादने घेत असून जागेअभावी येथील १२ मोठ्या उद्योगांचा गुजरातला विस्तार होत आहे. येथे विस्ताराला आवश्यक जागा नसल्याने उद्योगांचा विस्तार करण्यासाठी उद्योजक गुजरातची निवड करीत आहेत.

डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न मागील २५ वर्षांपासून गाजत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना आणि कारवाया केल्या गेल्या. डोंबिवलीत काही कारखान्यांमध्ये स्फोट झाले आहेत. प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाच्या दुर्घटनेनंतर कारखाने स्थलांतरित करण्याची मागणी झाली. त्याचबरोबर १५६ उद्योगांच्या स्थलांतराचा प्रश्न एमआयडीसीच्या दप्तरी आहे. उद्योगांच्या स्थलांतरास उद्योजकांचा विरोध आहे. त्याऐवजी उद्योग बंद करण्याची भूमिका उद्योजकांकडून यापूर्वीच घेण्यात आली होती. याचा फेरविचार करण्याची भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिनाभरापूर्वीच एका कार्यक्रमात मांडली होती. 

५० कोटींची उलाढाल डोंबिवली औद्योगिक वसाहत ही १९६४ मध्ये स्थापन झाली. येथे आता उद्योजकांना विस्तारीकरणासाठी वाव नाही. त्यामुळे डोंबिवलीतील १२ उद्योजकांनी गुजरातमध्ये विस्तार करण्यास पसंती दिली आहे. या उद्योजकांची उलाढाल ही ५० कोटी रुपये आहे. 

९० दिवसांत ना-हरकत प्रमाणपत्रदेशात अन्यही राज्ये आहेत. मात्र, गुजरातला उद्योजक पसंती का देतात, याविषयी उद्योजकांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, गुजरातला उद्योग सुरू करायचा असल्यास तेथे सरकारने प्रत्येक उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी लागणारे पर्यावरण खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आधीच मिळवून ठेवले आहे. ९० दिवसांत पर्यावरण खात्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळते. 

निम्म्या दरात वीज महाराष्ट्रात संबंधित प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एका उद्योजकाला २० ते २५ लाख रुपयांचा खर्च येतो. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागतात. एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेला घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी पर्यावरण खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यास सरकारकडून दिरंगाई केली जाते. गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या निम्म्या दरात वीज उपलब्ध होते. या कारणामुळे उद्योजकांकडून गुजरातला पसंती दिली जात आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली