शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

शिवसेना शिंदे गटाने काल गाजावाजा करत शुभारंभ केलेले ठाकुर्लीचे एस्कलेटर आज बंद

By अनिकेत घमंडी | Updated: August 25, 2023 08:28 IST

प्रवाशाची ट्विट करून तक्रार

अनिकेत घमंडी, डोंबिवली: शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी गुरूवारी मोठा गाजावाजा करत ठाकुर्ली येथील पूर्वेला असलेल्या स्वयंचलित जिन्याचा शुभारंभ केला,  मात्र शुक्रवारी पहाटेपासून ते जिने बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. 

कौस्तुभ देशपांडे या प्रवाशाने त्यासंदर्भात ट्विट करून रेल्वेला तक्रार देऊन नाराजी व्यक्त केली. शुभारंभ करताना सगळी काळजी घेऊन चाचण्या करून ती सेवा सुरू केली जाते तर मग अचानक बंद का ठेवली? तसेच जर सकाळी ७ नंतर सुरू करण्याचे ठरवले असेल तर तसे कोणी ठरवले आणि का? असा सवालही त्यांनी केला. ज्या राजकारणी नेत्यांनी येथे येऊन ते सुरू केले त्या नेत्यांनी आता बंद का ठेवले याची कारणमीमांसा स्पष्ट करून रेल्वेला जाब विचारणा करावी असेही देशपांडे यांचे म्हणणे आहे.

सुविधा सुरू करायची आणि बंदही करायची हे काही बरोबर नाही, सेवा देताना ती अव्याहत सुरू ठेवणे हे रेल्वेचे कर्तव्य आहे. टेक्नोसॅव्ही होताना ती अखंड द्यावी. तसेच मध्यरात्री शेवटची लोकल।गेल्यावर हवं तर बंद करून पहाटे निदान पाच वाजता ती सेवा सुरू असायला हवी, पण तसे झाले नाही.त्यामुळे झटपट प्रवासाची हमी देणाऱ्या रेल्वेने ती सेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली, त्याचे नियोजन फसले अशी टीका त्यांनी केली.डोंबिवली पूर्वेला जी यंत्रणा आहे ती देखील नेहमी बंद असते, त्यामुळे नागरिकांचे हाल होतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. रेल्वे यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांनी तातडीने त्या स्वयंचलीत जिने संदर्भात कार्यवाही करून सेवा तात्काळ सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी देशपांडे यांनी केली.देशपांडे यांनी काल सुरू आज बंद मध्य रेल्वे एक कदम पिछे अशा आशयाचे ट्विट करून नाराजी व्यक्त केली. दोन्ही फोटो टाकून त्यांनी वस्तुस्थिती दाखवून वास्तवता दर्शवली.दुसरे एक प्रवासी मंदार अभ्यंकर यांनीही नाराजी दर्शवली त्यांनी तर नव्याचे नऊ।दिवस या उक्तीनुसार तरी सेवा द्या अशी टीका केली आणि ट्विट।केले.

टॅग्स :thakurliठाकुर्लीcentral railwayमध्य रेल्वे