शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या सासुरवाडीत शिंदे गटाचा धक्का! दिवाळी होताच डोंबिवलीत शिवसेना मध्यवर्ती शाखेचा घेतला ताबा

By अनिकेत घमंडी | Updated: October 27, 2022 12:48 IST

शहरात राजकीय वातावरण तंग, शाखेला पोलीस छावणीचे स्वरूप

अनिकेत घमंडी/डोंबिवलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट समर्थकांमधून विस्तव जात नसल्याचे दृश्य डोंबिवलीत गुरुवारी दिसून आले, बुधवारी दिवाळी होताच शिंदे गटाने येथील मध्यवर्ती शिवसेना शाखेचा सकाळीच ताबा घेतला. त्यामुळे अल्पवधीतच राजकीय वातावरण तंग झाल्याने शहरात या घटनेची प्रचंड चर्चा सुरू होती.

दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ही राजकीय घडामोड अतिशय वेगाने झाली. मध्यवर्तीवर सकाळीच शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, राजेश।कदम, विश्वनाथ राणे, महेश पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी  आल्याने राजकीय घडामोड होणार हे स्पष्ट झाले होते, त्या पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटक कविता गावंड, शहरप्रमुख विवेक खामकर हे मध्यवर्ती शाखेत आले, शाखा ही शिवसेनेची असून तिला ताब्यात घेता येणार नाही असे गावंड यांनी सांगितले, तसेच खामकर यांनीही ठाकरेंनी जबाबदारी दिली असून ती।पार पाडणे हे प्रमुख असल्याने जे काही विषय आहेत ते चर्चेने सोडवावे, दादागिरी भाईगिरी कोणी करू नये असे म्हणाले.

त्यावर शाखेची जागा ही ज्याची आहे त्यासंदर्भात कागदपत्रे आले असून ते बघावे आणि पुढे जावे कोणी वाद घालू नये अशी भूमिका शिंदे गटाच्या समर्थकांनी घेतली. काही वेळाने जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ तेथे आले, त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांशी चर्चा केली.दरम्यान पोलिसांना देखील याबाबत माहिती नसल्याने शाखेबाहेर आधी शिंदे गटाचे  समर्थक आणि उध्दव ठाकरे समर्थकांनी गर्दी।केली होती, त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी शाखेबाहेर ताबा घेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेत पोलीस तैनात केले.मध्यवर्ती शाखेतच खासदार श्रीकांत शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय असून त्या कार्यालयाला।काही दिवसांपासून टाळे लावले होते, दोन महिन्यांपूर्वी देखील असा तणाव झाला होता, त्यावेळीही चर्चेअंती काही भाग उद्धव ठाकरे गट तर काही भाग हा शिंदे गटाकडे असावा असे सांगण्यात आले होते, मात्र त्यानंतर गुरुवारी दिवाळी होताच वेगाने घडलेल्या घडामोडीने शिंदे गटाने शहर शाखेचा ताबा घेतल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. दिवसभरात आणखी राजकीय वातावरण तापण्याची एकंदर चिन्ह दिसून येत आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे