शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर फसवणूक प्रकरणी ईडीकडून केडीएमसीकडे कागदपत्रांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: October 18, 2022 19:45 IST

ईडीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणातील कागदपत्रांची मागणी केली आहे.

कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन परवानगी मिळविल्याचे भासविले. त्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या प्रकरणी डोंबिवलीत ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. दरम्यान ईडीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणातील कागदपत्रांची मागणी केली आहे.

बिल्डरांकडून फसवणूक करण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात वास्तू विशारद संदीप पाटील यांनी उघडकीस आणली. या प्रकरणात उच्च न्यायालयात पाटील यांनी दाखल केलेली एक याचिकाही न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान महापालिकेने डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यात ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेसह रेरा प्राधिकरणाची फसवणूक करण्यात आली असल्याने पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात ठाणो गुन्हे शाखेच्या अधिकारी वर्गाची एसआयटी नेमली आली. या प्रकरणात नागरीकांसह सरकार आणि सरकारी प्राधिकरणाची फसवणूक झाली आहे.

त्यामुळे हे प्रकरण गंभीर स्वरुपाचे आहे. मोठय़ा आर्थिक घोटाळ्य़ाची माहिती ईडीला दिली जाते. एसआयटीने ही माहिती ईडीला दिली होती. त्या आधारेच ईडीने महापालिका आयुक्तांकडे या फसवणूक प्रकरणातील कागदपत्रांची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने ईडीने त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते. या प्रकरणाचा तपास ईडी देखील करु शकते.दरम्यान ईडीची या प्रकरणात एंट्री होणार असल्यास त्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्वागत केले आहे. बिल्डरसह महापालिका आणि रेराच्या अधिका:यांचीही चौकशी केली जावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली