शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर ड्रोनची नजर, केडीएमसीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 01:19 IST

KDMC News : कचरासमस्या सोडवण्यासाठी केडीएमसीतर्फे शून्य कचरा मोहीम राबवली जात आहे. कचरा वर्गीकरण करा, तसेच रस्त्यावर कुठेही कचरा फेकू नका, असे आवाहन मनपा करत आहे

कल्याण : कचरासमस्या सोडवण्यासाठी केडीएमसीतर्फे शून्य कचरा मोहीम राबवली जात आहे. कचरा वर्गीकरण करा, तसेच रस्त्यावर कुठेही कचरा फेकू नका, असे आवाहन मनपा करत आहे; मात्र तरीही अनेक लोक उघड्यावर कचरा टाकतात. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. डोंबिवली पश्चिमेतून बुधवारपासून त्याची सुरुवात झाली आहे.मनपाने शून्य कचरा मोहीम राबवताना शहरांतील कचरा कुंड्या हटविल्या आहेत. ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीत द्यावा, असे आवाहन केले आहे. ओला कचरा बायोगॅस प्रकल्पाकडे, तर सुका कचरा प्रक्रिया केंद्राकडे कसा जाईल, यावर महापालिकेने भर दिला आहे. तसेच कचरा कुठेही टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी स्वच्छता मार्शलही नेमले आहेत; मात्र नागरिक आणि स्वच्छता मार्शल यांच्यात कचरा टाकण्याच्या कारवाईवरून वादंग होतो. त्यावर नामी युक्ती शोधताना मनपाने स्मार्ट सिटी अंतर्गत ड्रोन कॅमेरा खरेदी केला आहे. या कॅमेऱ्याद्वारे आता कुठेही कचरा फेकणाऱ्यांना पकडून त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.दरम्यान, कचरा टाकणाऱ्यांविरोधात यापूर्वी मनपाने कारवाई करून त्यांना दंड आकारून थेट कोर्टापुढे हजर केले आहे. त्याच कारवाईचे पुढचे पाऊल म्हणून ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे. डोंबिवली पश्चिमेत सुरू केलेली ड्रोन कॅमेऱ्याची कारवाई आता पुढे अन्य भागांतही सुरू केली जाणार आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका