शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी पहाटला गर्दी करू नका; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आणि पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:36 IST

Dombivali : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिपावलीच्या दिवशी नेहरू रोड, फडके रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

डोंबिवलीः दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथील पुर्वेकडील फडके मार्गावर तरुणाईचा सळसळता उत्साह पहायला मिळतो. परंतू यंदा कोरोनाचे सावट असल्याने दिवाळी पहाटच्या निमित्ताने याठिकाणी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिपावलीच्या दिवशी नेहरू रोड, फडके रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

यासंदर्भातले जाहीर फलक मुख्य चौकात पोलीस विभागाकडून लावण्यात आले असताना  केडीएमसी फ प्रभागाच्या वतीने आणि पोलीस विभागाच्या वतीने उदघोषणेच्या माध्यमातून नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले. आजच्या घडीला केडीएमसी परिक्षेत्रातील कोरोना रूग्ण संख्या कमी झाली असलीतरी कोरोनाच्या दुस-या लाटेची शक्यता पाहता दिवाळी सणावरही हे सावट कायम राहीले आहे. दिवाळीला पहाटेपासून फडके रस्त्यावर मोठया प्रमाणावर तरूण-तरूणी एकत्रित येऊन शुभेच्छांची देवाणघेवाण करीत असतात. 

तत्पूर्वी येथील गणपतीच्या मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन करून दिवाळी साजरी करण्याची परंपरा गेली अनेक वर्षापासून याठिकाणी पहायला मिळते. परंतू यंदा जमावबंदीचा आदेश लागू करीत सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे. पोलीस विभागाने आणि केडीएमसीने आज फडके मार्गावर उदघोषणा करुन गर्दी न करण्याचे  आवाहन केले. फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी येऊ नका.  नियम पाळा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याण