शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली रेल्वे स्थानक झाले डम्पिंग ग्राऊंड; KDMC नं उचललं कठोर पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 20:04 IST

कचऱ्याचा अधिभार ठेकेदाराकडून वसूल करणार

कल्याण  - डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी ब्रीज खाली असलेल्या कच-याला आग लागली होती. ऐन गर्दीच्या वेळी ही आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होत. याअगोदरही कच-यामुळे  आग लागल्याचे प्रकार झाले आहेत. रेल्वे स्थानकातील प्लटफॉर्म क्रमांक एक खाली मोठ्या प्रमाणावर कचरा साठवला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन डम्पिंग  ग्राऊंड होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कच-याची  आज महापालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी पाहणी केली. आतापर्यंतच्या कचऱ्याचा अधिभार ठेकेदाराकडून  वसूल करणार असंही कोकरे यांनी स्पष्ट केलं आहे. 

डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी, दुकानदार, फेरीवाले, स्टॉलधारक यांच्यामुळे तयार होणारा कचरा गोळा करून हा कचरा रेल्वेच्या पादचारी पुलाखाली गोळा केला जातो. महिनाभरापासून हा कचरा उचलण्यात आला अचानक या साचलेल्या ढिगाला आग लागली. या कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने स्थानकाच्या सुरक्षेसह प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.हा कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची नसल्याचं सांगत   स्वच्छतेसाठी रेल्वे प्रशासनाने या कच-याची सुका आणि ओला अशी विगतवारी करत विल्हेवाट लावावी अशा सूचना संबंधित रेल्वेच्या ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यत महापालिकेने रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतून किती कचरा उचलला आहे याची माहिती घेत त्याचा अधिभार ठेकेदाराकडून वसूल केला जाणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.तर स्टेशन परिसरातील  अस्वच्छतेमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असून अस्वच्छता खपवून घेणार नसल्याची तंबी देखील  ठेकेदाराला देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दिवसात ठेकेदाराकडून कोणती भूमिका घेतली जाते? ते पहावं लागेल. तसेच एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरचं रेल्वे प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका