शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली एम.आय.डी.सी. औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 13:17 IST

सदर भागातील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची लांबी २१.२८ किमी असून निवासी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी १३.३८ किमी आहे.

कल्याण: खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघातील कल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली क्षेत्रातील एम.आय.डी.सी. औद्योगिक निवासी विभागातील रस्ते देखभाल व दुरुस्तीसाठी सन १९८९ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले होते. सदर भागातील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची लांबी २१.२८ किमी असून निवासी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी १३.३८ किमी आहे. सदर रस्ते पूर्ण रुंदिकरणासाठी विकसित करण्यात आलेले नाहीत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटार नसल्याने ते पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब होतात. त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत हि बाब खा.डॉ. शिंदे यांच्या निदर्शनास आली. 

त्यास अनुसरून नागरी सुविधेच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रातील रस्ते विकसित करावयाचे झाल्यास येणारा प्रकल्प खर्च क.डों.म.पा व म.औ.वि.म. यांचेमध्ये ५०-५० टक्के विभागातून करण्याबाबत महापालिकेमार्फत प्राथमिक सहमती कळविण्यात आली होती. यासंदर्भात विभागीय स्तरावर मा.मुख्य सचिव यांचेकडे म.औ.वि.म यांचेमार्फत ११०.३० कोटी खर्चाचा ढोबळ प्रस्ताव सदर करण्यात आला होता. त्यानंतर मऔविमच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात येऊन त्यात निवासी क्षेत्रातील १३.३८ किमी लांब रस्त्याचे कॉंक्रीटीकरण क.डों.म.पा ने करावे (खर्च अंदाजे रक्कम रु.५२.९३ कोटी) व  औद्योगिक क्षेत्रातील ११.०१५ किमी लांब रस्त्याचे कॉंक्रीटीकरण मऔविमने करावे. (खर्च अंदाजे रक्कम रु.५७.३७ कोटी) असा प्राथमिक निर्णय घेण्यात आला.    कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच याबाबत करावयात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेमुळे महानगरपालिकेवर मोठा ताण असून वरीलप्रमाणे रस्ते विकसित करण्यासाठी अनुदान स्वरुपात निधी प्राप्त होणे आवश्यक असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी तत्काळ नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले व स्वतः यासाठी वारंवार पाठपुरावा करीत असून त्यास अखेर यश प्राप्त झाले आहे.  

त्यास सकारात्मक प्रतिसाद म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विस्तारित नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रस्ते क.डों.म.पा. व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेमार्फत सयुंक्तपणे विकसित करण्याचा कामास प्रशासकीय मंजुरी देऊन एकूण अंदाजित रक्कम रु. ११०.३० कोटी पैकी ५०% अनुदान रक्कम ५७.३७ कोटी अर्थसहाय्य अनुदान स्वरुपात कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेला वितरीत करण्याचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेमार्फत महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांना देण्यात आले आहे. याबद्दल महापालिका व खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांचेवतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व एम.एम.आर.डी.ए. व सर्व संबधीत प्रशासन अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली