शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळे झोन न करता उद्योग उभे राहिलेच कसे? आरसीसी कन्सल्टंट माधव चिकोडींचा सवाल

By अनिकेत घमंडी | Updated: June 14, 2024 12:13 IST

Dombivali MIDC News: डोंबिवली शहरात रासायनिक कंपन्यांत होणाऱ्या स्फोटांच्या मालिकेला एमआयडीसीचे सदोष धोरण जबाबदार असल्याची टीका प्रख्यात आरसीसी कन्सल्टंट, नगररचना अभ्यासक माधव चिकोडी यांनी केली.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - शहरात रासायनिक कंपन्यांत होणाऱ्या स्फोटांच्या मालिकेला एमआयडीसीचे सदोष धोरण जबाबदार असल्याची टीका प्रख्यात आरसीसी कन्सल्टंट, नगररचना अभ्यासक माधव चिकोडी यांनी केली. प्लॉटची रचना करताना नियमांची पायमल्ली झाली असून झोनिंग न करता कंपन्या कशा उभारल्या? इंजिनिअरिंग उद्योगांशेजारी केमिकल कंपन्या उभ्या राहिल्याच कशा, असा सवाल चिकोडी यांनी केला. उद्योजक आणि सरकारी अधिकाऱ्यांनी कायद्याचे काटेकोर पालन न केल्याने डोंबिवलीकरांच्या पाचवीला विघ्न पुजले आहे.

औद्योगिक प्लॉटची रचना ही त्याच्या वापरावर आणि उत्पादनांवर अवलंबून असते. रासायनिक, औषधी, अभियांत्रिकी, घातक रसायनी, गोडाऊन, व्यावसायिक गाळे इत्यादी विविध उद्योगांचे झोनिंग झाल्यास  सांडपाणी, पाण्याची आवश्यकता, विजेची आवश्यकता याचे प्लॅनिंग करणे सोपे होते. सगळ्यात कहर म्हणजे औद्योगिक क्षेत्राची विभागणी फेज एक आणि फेज दोन अशी करून दोघांच्या मध्ये रहिवासी विभागाची रचना असे उदाहरण जगाच्या पाठीवर क्वचितच पाहायला मिळेल, अशी टीका त्यांनी केली. कायद्याप्रमाणे इमारतीच्या चारही बाजूस जागा सोडणे बंधनकारक आहे, असेही ते म्हणाले. 

नियमांना हरताळअनागोंदी कारभारामुळे होणारे परीक्षण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांचे काम सोपे होते; परंतु बहुतांश कंपन्या नियमांना हरताळ फासत असल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामधील अधिकाऱ्यांचे फावते. देवाण-घेवाण करून अनधिकृत गोष्टी नियमित केल्याचाही आरोप चिकोडींनी केला. 

सरकारी अधिकारी हाेतात मालामालएमआयडीसीचा आराखडा तयार केला तेव्हा बफर झोन, उद्याने, क्रीडांगणे, मोकळी जागा, नाले, नाल्याच्या बाजूची राखीव जागा याचा समावेश होता. गेल्या काही वर्षांत जमिनीचे भाव वधारल्याने एमआयडीसीने वरील सर्व राखीव जागा भूमाफियांच्या मदतीने विकायला काढल्या आणि बक्कळ पैसे कमावला. यामध्ये सरकार दप्तरी पैसे जमा झाला आणि सरकारी अधिकारी मालामाल झाले. या सर्वांना पाठीशी घालणारे स्थानिक राजकारणीही मालामाल झाले. सामान्य माणूस हा यंत्रणेचा बळी ठरल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी