शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले दुर्गाडीच्या विकासासाठी २५ कोटीच्या निधीची मागणी; शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती

By मुरलीधर भवार | Updated: October 13, 2023 17:39 IST

गेली ५४ वर्षापासून शिवसेनेच्या वतीने याठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो.

कल्याण - ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीच्या विकासाकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावी अशी मागणी किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे. किल्ले दुर्गाडी येथे दुर्गाडी देवीचे मंदीर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याठिकाणी नवरात्र उत्सव सुरु केला. गेली ५४ वर्षापासून शिवसेनेच्या वतीने याठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. येत्या १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान किल्ले दुर्गाडीवरी नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. त्याची माहिती शहर प्रमुख पाटील यांनी आज दिली. या संदर्भात किल्ले दुर्गाडीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 

या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील उपस्थित होते. नवरात्र उत्सवापूर्वी किल्ले दुर्गाडीची पाहणी शहर प्रमुख पाटील यांनी केली होती. शहर प्रमुख पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी किल्ले दुर्गाडीच्या विकासाकरीता २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आणखीन पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर निधीतून काही विकास कामे प्रगतीपथावर आहे. किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सवाचे आमंत्रण मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यासाठी समिती गेली होती. त्यावेळी ल्किल्ले दुर्गाडी विकासासाठी आणखीन २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. हा निधी लवकर मंजूर होणे अपेक्षित आहे. या नवरात्र उत्सवास स्वत: मुख्यमंत्री येणार आहे. त्याचबराेबर कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते १६ आ’क्टोबर रोजी किल्ले दुर्गाडीवर दुर्गाडी देवीची आरती करण्यात येणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणShiv Senaशिवसेना