शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण दुर्गाडी खाडीवरील नव्या पूलाच्या दोन लेनचे लोकार्पण ३१ मे रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:48 IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण; शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती

 

कल्याण-भिवंडी-कल्याण रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सहा पदरी पूलापैकी दोन लेनचे काम पूर्ण झाले आहे. या दोन लेनचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ३१ मे रोजी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. दोन लेनच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी आज आमदारांनी केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.याप्रसंगी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी रविंद्र कपोते, शरद पाटील, प्रभूनाथ भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावरील दुर्गाडी खाडीवरील दोन लेनचा पूल हा वाहतूकीसाठी अपुरा पडत होता. त्याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होती. ही कोंडी दूर करण्यासाठी खाडीवर सहा पदरी पूल तयार करण्यास मंजूरी देण्यात आली होती. या पूलाचे काम २०१६ रोजी सुरु करण्यात आले. मात्र नेमलेल्या कंत्रटदाराकडून संथगतीने काम सुरु असल्याने कंत्रटदाराकडून काम काढून घेण्यात आले. त्याठिकाणी टी अॅण्ड टी कंपनीला देण्यात आले. या कंपनीने कामाला गती दिली. मात्र २०१९ साली अतिवृष्टीचा कामाला फटका बसला. त्यापाठोपाठ २०२० मध्ये कोरोनाचा फटका बसला. अनेक अडचणीवर मात करीत या पूलाच्या दोन लेन पूर्णत्वास आल्या आहेत. या कामावर पालकमंत्री एकनाथ शिंदे जातीने लक्ष ठेवून होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या दोन लेन मार्गी लागल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले. दोन लेन खुल्या केल्याने अस्तित्वात असलेल्या जुन्या पूलाच्या दोन लेन आणि नव्या पूलाच्या दोन लेन अशा मिळून चार लेन वाहतूकीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सुरु असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी आमदार भोईर यांनी केली. यावेळी शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी सीएनजी पेट्राले पंपाच्या नजीक मागच्या पावसाळ्य़ात नाल्या नजीक रस्ता खचला असून त्याकडे महापालिकेचे प्रशासन लक्ष देत नाही. याठिकाणी वाहने नाल्यात पडून मोठी दुर्घटना होऊ शकते याकडे लक्ष वेधले आहे. नालेसफाईच्या कामातील त्रूटी कंत्रटदाराच्या लक्षात आणून देण्याकरीता हा पाहणी दौरा असून नालेसफाई चांगली व्हावी. कुठेही पावसाळ्य़ात पाणी तुंबू नये अशा सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.