शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीत 36 दिवसांत आढळले तब्बल 22 हजार 168 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:57 IST

कल्याण पश्चिमेसह डोंबिवली पूर्व हॉटस्पॉट : रुग्ण दुपटीचा कालावधी ४३ दिवसांवर

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाने कहर केला असून, १ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत आढळलेल्या रुग्णांचा आढावा घेता गेल्या ३६ दिवसांत तब्बल २२ हजार १६८ रुग्ण आढळले आहेत. तसेच ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत कल्याण पश्चिममध्ये सात हजार ८७६ तर डोंबिवली पूर्वमध्ये सात हजार ७७४ रुग्ण आढळल्याने हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.मनपाच्या हद्दीत कोरोना रुग्णसंख्या कमालीची वाढत असून दररोज आढळणारी रुग्णसंख्या आजमितीला तेराशे ते सतराशेच्या दरम्यान आहे. मंगळवारी एक हजार ३०९ रुग्णांची भर पडल्याने आजवरची कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८६ हजार ८०६ पर्यंत पोहोचली आहे. यातील ७४ हजार १८२ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २७५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्वेत रुग्णांचा वाढता आलेख चिंताजनक आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या दोन विभागांमध्ये दररोज ४८ ते ५८ च्या आसपास आढळणारी रुग्णांची संख्या आजमितीला ५०० ते ६०० च्या वर गेली आहे. ४ एप्रिलला डोंबिवली पूर्वेत ५१० तर कल्याण पश्चिमेत ६५० रुग्ण आढळले आहेत. गेल्या ३६ दिवसांतील रुग्णांची आकडेवारी पाहता डोंबिवली पूर्वेत सात हजार ७७४ तर कल्याण पश्चिमेत सात हजार ८७६ इतकी आहे. कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेतील परिस्थिती फारशी आलबेल आहे, असे नाही. त्या ठिकाणीही तीन हजार ३० डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेत तीन हजार ५४४ जणांना बाधा झाली आहे. यापाठोपाठ मांडा-टिटवाळा भागात एक हजार ६९, मोहना परिसरात ३४० तर पिसवलीत २४ रुग्ण आढळून आले आहेत. मनपा हद्दीतील रुग्णसंख्येत दिवसागणिक भरमसाट वाढ होत असल्याने रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे मुश्कील झाले असून, आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.महापालिका हद्दीत मृत्यूदर १.६७ , बरे हाेण्याचे प्रमाण ८६ टक्केकोरोनाच्या पहिल्या लाटेत १२ जुलैला सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. त्या वेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९ ते १० दिवसांवर आला होता. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात हा कालावधी २१० ते २६० दिवसांवर गेला होता. परंतु, सद्य:स्थितीला रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी आता पुन्हा ४३ दिवसांवर आला आहे. कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पाहता सद्य:स्थितीला मनपाच्या हद्दीतील मृत्युदर हा १.६७ टक्के इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के इतके आहे.कोरोना चाचण्यांमध्ये वाढएकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मंगळवारी साडेपाच हजारांच्या आसपास नागरिकांची कोरोना चाचणी केल्याची माहिती मनपाच्या साथरोग विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या