शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

CoronaVirus News: केडीएमसी क्षेत्रात लवकरच 1136 बेड होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 23:48 IST

मुख्य वैद्यकीय अधिकारी : टिटवाळा कोविड रुग्णालय सुरू

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. आजच्या घडीला ९० टक्के बेड हे फुल झाले आहेत. दुसरीकडे बेड वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आजपासून टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा येथे ६० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. अन्य ठिकाणी कोविड सेंटर व रुग्णालये सुरू करण्याचे काम सुरू आहे.महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले की, टिटवाळा कोविड रुग्णालयात ६० बेड आहे. त्यापैकी नऊ बेड आयसीयू आणि ५१ बेड हे ऑक्सिजनचे आहेत. महापालिका शहाड येथील साई निर्वाणा इमारतीत कोविड सेंटर सुरू करणार आहे. त्या ठिकाणी ६३६ बेडची सुविधा आहे. हे सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू होईल. त्याचबरोबर गांधारे येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात २०० बेडचे सेंटर दोन दिवसांत सुरू केले जाईल. एनआरसी शाळेत ३०० बेडची सुविधा असलेले कोविड सेंटर आठवडाभरात सुरू केले जाईल. येत्या आठवडाभरात ११३६ बेडची सुविधा रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध होणार आहे.पालिकेचे भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा, डोंबिवली क्रीडा संकुल, डोंबिवली सावळाराम महाराज क्रीडासंकुल, टेनिस कोर्ट, कल्याणमध्ये आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर, डोंबिवलीतील पाटीदार भवन येथे कोविड सेंटर सुरू आहे. त्या ठिकाणी तळमजल्यावर १०० बेडची अतिरिक्त सेवा दिली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही. त्यांच्यासाठी १०० पैकी ५० स्टेप डाऊन बेडची साेय केली आहे, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे.खासगी रुग्णालयांना सूचनामहापालिकेच्या रुग्णालयात बेड खाली होताच तो अन्य रुग्णाला उपलब्ध करून दिला जातो. तसेच खासगी रुग्णालयातील बेड उपलब्धतेची माहिती त्यांनी डॅशबोर्डवर द्यावी याची सक्ती केली आहे. पालिकेच्या वेबसाइटवरही बेडचा डॅशबोर्डची माहिती दिली जात आहे. काही रुग्णालये ही माहिती अपडेट करत नसल्याची बाबही निदर्शनास आली आहे. त्यांनाही सूचित करून बेड उपलब्धतेसंबंधी अपडेट देण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या