शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

"पहिल्या आरमाराच्या स्थापनेत आगरी-कोळी बांधवांचे योगदान"

By मुरलीधर भवार | Updated: December 16, 2023 15:56 IST

इतिहास अभ्यासक निनाद पाटील-बंदर पाडेकर यांचे प्रतिपादन

डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराजांनी आगरी-कोळी बांधवांच्या उपस्थितीत स्वराज्याच्या व भारताच्या इतिहासातील पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच पेशव्यांनीही आगरी-कोळी बांधवांमधील धैर्य, काटकपणा आणि प्राण पणाला लावण्याची वृत्ती ओळखून स्वराज्याच्या मोहिमांमध्ये सहभागी करून घेतले होते, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक निनाद पाटील-बंदरपाडेकर यांनी शुक्रवारी येथे केले.

आगरी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी स्वराज्य उभारणीत `आगरी समाजाचा सहभाग' या विषयावर निनाद पाटील-बंदरपाडेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. संयोजन समितीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी त्यांचे स्वागत केले.छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांचा पाडाव केल्यानंतर कल्याण-भिवंडी पादाक्रांत केली. त्यानंतर पोर्तुगीज कारागिरांच्या साथीला आगरी-कोळी बांधवांना देत जहाजबांधणी सुरू केली होती. मुरुड-जंजिरा मोहिमेत १६७५ मध्ये कुलाब्याचे लाय पाटील यांनी किल्ल्याच्या तटाला शिड्या लावण्याची अशक्यप्राय कामगिरी केली. मात्र, वेळेवर सैन्य न आल्यामुळे विजय हुकला होता. लाय पाटील यांच्या पराक्रमाची दखल छत्रपती शिवाजी महाराजांनी घेऊन त्यांना रायगडावर सन्मान करून `पालखी' नावाचे गलबत भेट दिले होते. १७३९ मध्ये द्रोणागिरीच्या मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी आगरी-कोळी भूमिपूत्रांची मोट बांधली होती. त्यातील ८०० सैनिकांची कुमक उरण-करंजा बेटावर तैनात केली. त्या ठिकाणी हल्ला करण्याचा इंग्रजांचा विचार होता. पण आगरी बांधवांच्या शौर्याची माहिती मिळाल्यावर इंग्रजांनी हल्ल्याचा विचार सोडून दिला होता, असे प्रतिपादन श्री. पाटील यांनी केले.

पेशव्यांच्या काळात वसईच्या मोहिमेत चिमाजीआप्पांना आन ठाकूर व मान ठाकूर यांनी मदत केली होती. त्यांनी वसई किल्ल्याच्या बुरुजाला चिरे पाडून सुरूंग भरला होता. या सुरुंगांच्या स्फोटाने बुरुज उद्धवस्त होऊन मराठ्यांचे सैन्य किल्ल्यात घुसले. परंतु, आन व मान ठाकूर यांनी स्फोटात बलिदान दिले. बोळींजच्या दौराजी पाटील यांनीही वसईच्या मोहीमेत सहभाग घेतला होता. तर अंजुरच्या गंगाजी नाईक-अंजुरकर यांनीही पेशव्यांच्या सैन्याला मदत केली होती. पेशवा रघुनाथराव पेशवा यांनी अटकेपार झेंडा फडकविला होता. या मोहिमेतही ५० आगरी-कोळी योद्धे सहभागी होते. परंतु, दुर्देवाने त्यांची सध्या कोठेही नोंद नाही, अशी माहिती निनाद पाटील यांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याण