शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी योगदान द्या; पंतप्रधान मोदींचे नवमतदारांना आवाहन

By अनिकेत घमंडी | Updated: January 25, 2024 18:31 IST

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कॉलेजांमध्ये नवमतदार संमेलनाचे थेट प्रक्षेपण

कल्याण :आगामी 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र बनण्यासाठी संपूर्ण देश काम करत असून भारताला विकसित देश बनवण्यासाठी युवा मतदारांचे तुमचे मत महत्त्वपूर्ण ठरेल अशा शब्दांत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नव मतदारांना आवाहन केले. आज असलेल्या राष्ट्रीय नवमतदार दिनानिमित्त मोदी यांनी देशभरातील ५० लाख नवमतदारांशी नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून संवाद साधला. कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने टिटवाळा, बल्याणी येथील दुबे कॉलेज आणि कल्याणातील ॲचिवर्स कॉलेजमध्ये या ‘नमो नवमतदाता संमेलन’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये या दोन्ही महाविद्यालयातील अनेक नवमतदार युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. 

उद्या भारत देश आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. येणारी पुढील 25 वर्ष ही तुमच्यासोबत देशासाठीही अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. तुमचे एक मत भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवेल, तुमचे एक मत आणि देशाच्या विकासाची दिशा या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले.

यावेळी अचिवर्स कॉलेजचे डॉ.महेश भिवंडीकर सर, दुबे कॉलेजचे प्रमूख राहुलजी दुबे, भाजपा मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप रतन पाटील, जिल्हा सचिव रमेश कोनकर, मोहेने टिटवाळा मंडल युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील, युवा मोर्चा कल्याण मंडल अध्यक्ष सौरभ गणत्रा, सरचिटणीस किरण चौधरी, मंडल सरचिटणीस प्रमोद घरत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा शैलेंद्र देशपांडे, युवा मोर्चा वार्ड क्र.१० अध्यक्ष भूषण बापट, वॉर्ड क्र.११ अध्यक्ष हेमंत गायकवाड, युवा मोर्चा वार्ड क्र.८ अध्यक्ष स्वप्नील पठारे आदी. पदाधिकारी विद्यार्थी मित्र मोठया संखेने उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान