शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरण अन् बोगदा मार्ग तयार करा; भाजपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 15:12 IST

भाजपा आमदार किसन कथोरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट

कल्याण- कल्याण माळशेज घाटाच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे. त्याचबरोबर मालशेज घाटयाच्या पायद्यापासून मढ र्पयत टनेल खोदून मार्ग तयार केला जावा अशी मागणी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात भाजप आमदार कथोरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. यावेळी पंचायत राज केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील हे देखील उपस्थित होते. 

ठाणे जिल्ह्यातील कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 आहे. कल्याण माळशेज घाट रस्ता हा चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव आमदार कथोरे यांनी यापूर्वी मांडला होता. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव हा जवळपास 1200 कोटी रुपये खर्चाचा आहे. दरम्यान दोन वर्षापूर्वी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे सव्रेक्षण करण्यासाठी कल्याण नगर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय तत्कालीन प्रांत अधिका:यांनी घेतला होता. मात्र काही कारणास्तव त्याचे सव्रेक्षण रखडले आहे. या चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी आमदार कथोरे यांच्यासह राज्यमंत्री पाटील यांनी पाठपुरावा केला आहे. याच संदर्भात कथोरे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिल्लीत भेट घेतली.

कल्याण माळशेज घाटाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरु करण्यात यावे या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. कल्याण नगरला जोडणारा रेल्वे मार्ग नाही. कल्याण मुरबाडर्पयत रेल्वेचे काम करण्यात येणार आहे. मात्र कल्याण नगर रस्त्यावर वाहतूकीचा ताण आहे. रस्ता अरुंद आहे. कल्याण माळशेज मार्गातून वाहतूक करताना विशेषत: पावसाळ्यात घाट मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे माळशेज घाटाच्या पायथ्यापासून एक बोगदा खोदून रस्त्या तयार केला जावा. हा रस्ता पार मढ येथे निघणार आहे. या रस्त्याचा डीपीआर तयार आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी येत्या 4 ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक घेतली जाईल असे आश्वासीत केले आहे.

दरम्यान नवी मुंबई मार्गे शीळफाटा ते एरंजड, म्हसा धसई मार्गे माळशेज घाट रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची मागणी कथोरे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली आहे. मुरबाड विधानसभा मतदार संघ हा भविष्यात राज्यातील सर्वच राष्ट्रीय महामार्गाना जोडणारा मतदार संघ असणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरी