शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करा!

By मुरलीधर भवार | Updated: February 22, 2023 17:40 IST

केडीएमसी आयुक्तांची सूचना, केली याेजनेच्या कामाची पाहणी

मुरलीधर भवार-कल्याण: केंद्र सरकारच्या अमृत याेजनेतून २७ गावांकरीता पाणी पुरवठा याेजना राबविण्याचे काम सुरु आहे. हे काम डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना कल्याण डाेंबिवली महापालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यानी संबंधित अधिकारी वर्ग आणि ठेकेदाराला दिल्या आहे. आयुक्त दांगडे यांनी आज अमृत पाणी पुरवठा याेजनेच्या कामाची पाहणी केली.

२७ गावे महापालिका हद्दीत २०१५ साली समाविष्ट करण्यात आली. या गावांना यापूर्वीपासून एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जात हाेता. या गावांमध्ये पाणी वितरण याेजना नव्हती. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाल्यावर केंद्राच्या अमृत याेजने अंतर्गत २७ गावांकरीता पाणी पुरवठा राबविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाला गती देण्यासाठी आयुक्तांनी आज याेजनेचे काम सुरु असलेल्या गाेळवली, दावडी, काेळे, काटई, संदप, सागाव याठिकाणी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

या ठिकाणी जलकुंभ उभारले जात आहे. त्याच्या टॅपिंगकरीता एकहजार मिलीमिटर व्यासाच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. याठीकाणी पाहणी केली. यावेळी प्रकल्प ठेकेदार, सल्लागार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित हाेते. यावेळी आयुक्तांनी ठेकेदाराला बजावले की, या याेजने अंतर्गत सर्व जलकुंभाची कामे एप्रिल २०२३ अखेर पूर्ण करा. टॅपिंग एकच्या नळ जोडणीचा फायदा १७ गावांना होणार आहे. ती पुढील एक महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. संपूर्ण याेजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण झाले पाहिजे. त्याप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना ठेकेदाराकडून कामाच्या प्रगतीचा बारचार्ट घेऊन त्याप्रमाणे दर दहा दिवसांनी आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात येईल आणि कामाची प्रगती किती झाली याची पाहणी करण्यात येईल अशा असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

ही याेजना कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेल्या डेडलाईनुसार पूर्णत्वास येईल यासाठी सर्व विभागांनी याेग्य पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याण