शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदाराच्या जीवितास धोका, न्यायालयात नोंदविला जबाब

By मुरलीधर भवार | Updated: November 21, 2022 14:51 IST

KDMC : बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदार संदीप पाटील यांच्या जिविताला धोका असल्याने त्यांनी या प्रकरणात कल्याण न्यायालयात जबाब नोंदविला आहे.

- मुरलीधर भवार कल्याण - बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदार संदीप पाटील यांच्या जिविताला धोका असल्याने त्यांनी या प्रकरणात कल्याणन्यायालयात जबाब नोंदविला आहे. मात्र पाटील यांना अद्याप पोलिस संरक्षण मिळालेले नाही. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन काही बिल्डरांनी महापालिकेची बांधकाम परवानगी मिळविल्याची कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रंच्या आधारे बिल्डरांनी रेरा प्राधिकरणास परवानगी मिळविल्याचे भासवून रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविले.  माहिती अधिकारात ही बाब तक्रारदार पाटील यांनी उघड केली. या प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच महापालिकेसह रेरा प्राधिकरणाकडे तक्रार केली.

महापालिकेने या प्रकरणात डोंबिवलीतील मानपाडा आणि रामनगर पोलिस ठाण्यात 65 बिल्डरांच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. त्याचबरोबर ईडीकडूनही चौकशी सुरु आहे. एसआयटीने आत्तार्पयत पाच जणांना अटक केली आहे. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जण आणि बिल्डारांची मिळून 56 बँक खाती गोठविण्यात आली. दरम्यान तक्रारदार पाटील यांच्या जिवितास धोका असल्याने पाटील यांनी त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली होती. त्यांना अद्याप पोलिस संरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचा फायनल जबाब नोंदविला जाईल  नाही याविषयी त्यांना साशंकता असल्याने त्यांनी कल्याण न्यायालयात त्यांचा जबाब नोंदविला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयkalyanकल्याण