शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : 750 प्रकरणात शर्तभंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा, तक्रारदार पांडूरंग भोईर यांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: November 22, 2022 18:05 IST

कल्याण तालुक्यातील 1 हजार 571 भूखंडापैकी 750 प्रकरणात शर्तभंग झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

कल्याण-कल्याण तालुक्यातील 1 हजार 571 भूखंडापैकी 750 प्रकरणात शर्तभंग झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. 750 प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदार पांडूरंग भोईर यांनी केली आहे. तक्रारदार भोईर यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली आहे. 

तक्रारदार भोईर यांनी डोंबिवली पूर्व भागात 2013 साली घर बूक केले होते. या घराचा ताबा त्यांना 2016 साली मिळणार होता. त्यांना घराचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी घराचा ताबा मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. तेव्हा त्यांनी माहिती घेतली. त्यांनी ज्या ठिकाणी घर घेतले आहे. ती जागा सरकारी आहे. सरकारी जागेवर हमी पत्रच्या आधारे महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी दिली गेली आहे. मात्र बिल्डराने नजराणा भरलेला नाही. भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर बिल्डरने रेडीरेकनरने 25 टक्के नजराणा रक्कम भरली. उर्वरीत रक्कम भरली नाही. या प्रकरणी भोईर यांनी लोकांयुक्तांकडे तक्रार केली. संबंधित बिल्डरला अडीच कोटीचा दंड आकारण्यात आला. या प्रकरणाची चौकशी लोकायुक्तांकडे सुरु आहे. लोकायुक्तांच्या सुनावणी दरम्यान हमी पत्र देण्याची, आराखडे मंजूर करण्याची आणि रजिस्ट्रेशन करण्याची तरतूद नाही.

दरम्यान भोईर यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयास तक्रार केली. त्या कार्यालयातून विचारणा झाल्यावर जिल्हाधिकारी आणि नगररचना विभागाकडून या प्रकारच्या 34 प्रकरणात नोटिस बजावण्यात आली होती. सरकारी जागेवरील आराखडा मंजूर करण्याचा अधिकार नसताना त्यांनी मंजूरी कशाच्या आधारे दिली असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला आहे. एका प्रकरणात बिल्डरला अडीच कोटीचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तर 750 शर्तभंग प्रकरणात सरकारची फसवणूक करुन कोटय़ावधी रुपयांचा महसूल संबंधितांनी बुडविला आहे. त्याच शर्तभंग करणाऱ्यांना दंड आकारुन नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरु आहे. मात्र बिल्डरांकडून फसवणूक झालेल्यांचे काय हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. त्यामुळे शर्तभंग करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई व्हावी. चौकशी केली जावी अशी मागणी भोईर यांनी केली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण