शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांचे पत्र म्हणजे ठराव नाही; १८ गावे वगळण्याबाबत निकाल ठेवला राखून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 00:20 IST

उच्च न्यायालयाचे मत : १८ गावे महापालिकेतून वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका याचिकाकर्ते संदीप पाटील, भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, संतोष डावखरे यांच्यासह नगरसेविका सुनीता खंडागळे यांनी दाखल केली होती

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळण्याच्या सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने १८ गावे वगळली जावी की नाही, याविषयीचा निकाल राखून ठेवला आहे. गावे वगळण्याबाबत पालिका आयुक्तांनी दिलेले पत्र म्हणजे महासभेचा ठराव होऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदवले आहे.

१९८३ सालापासून महापालिकेत असलेली २७ गावे सोयीसुविधा मिळत नसल्याने राज्य सरकारने २००२ साली महापालिकेतून वगळली. त्यानंतर ही गावे पुन्हा २०१५ साली महापालिकेत समाविष्ट केली. ही गावे महापालिकेतून वगळण्याची मागणी होती. या गावांची स्वतंत्र नगर परिषद करावी, अशी मागणी केली असताना राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, २७ पैकी नऊ गावे महापालिकेतच ठेवली. 

१८ गावे महापालिकेतून वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका याचिकाकर्ते संदीप पाटील, भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, संतोष डावखरे यांच्यासह नगरसेविका सुनीता खंडागळे यांनी दाखल केली होती. शुक्रवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान १८ गावे महापालिकेतून वगळण्याचा अभिप्राय महापालिकेचा होता का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. हा प्रश्न यापूर्वीच्या सुनावणीदरम्यानही उपस्थित केला होता. १८ गावे वगळण्याचा ठराव महासभेने केलेला नव्हता. महापालिकेचा अभिप्राय नसताना गावे कशाच्या आधारे वगळली, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावेळी महापालिकेच्या वतीने आयुक्तांनी दिलेले पत्र न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

लवकरच देणार निकालआयुक्तांनी राज्य सरकारला दिलेल्या पत्रात २७ पैकी नऊ गावे महापालिकेत ठेवावीत, असे म्हटले होते. आयुक्तांंचे पत्र हे महासभेचा अभिप्राय होऊ शकत नाही, असा मुद्दा सुनावणीदरम्यान न्यायालयाने उपस्थित केला आहे. या मुद्यांना महापालिकेचे वकील राव आणि याचिकाकर्त्यांचे वकील दधीची म्हैसपूरकर यांनी दुजोरा दिला आहे. म्हैसपूरकर यांनी सांगितले की, महापालिकेतून गावे वगळता येत नाही. ती वगळण्यापूर्वी महापालिका अधिनियमानुसार अधिसूचना काढावी लागेल. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून, तो लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाHigh Courtउच्च न्यायालय