शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

 कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली; नव्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड

By मुरलीधर भवार | Updated: November 17, 2023 19:25 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली करण्यात आली आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भाप्रसे डॉ. इंदूराणी जाखड यांची महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याची बदली झाल्यावर आयुक्त दांगडे यांनी १३ जुलै २०२२ रोजी महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला होता. दांगडे हे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मर्जीतील आयुक्त होते. १ वर्षे ३ महिने दांगडे यांनी महापालिका आयुक्त पदाची धुरा संभाळली. या विविध प्रकल्पांना गती देण्याचे काम केले. मात्र सत्ताधारी पक्षातील माजी नगरसेवकांकडून दांगडे यांच्याकडून विकास कामे केली जात नसल्याची ओरड केली जात होती.

त्यावर अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी बैठका घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. दांगडे काही दिवसापूर्वी प्रशासकीय प्रशिक्षणाकरीता गेले असता त्यांच्या बदलीची आफवा उडविली गेली होती. तसेच ते नुकतेच काही काळ वैदकीय रजेवर गेले होते. तेव्हा देखील त्यांची बदली झाली असून ते पुन्हा कामावर रूजू होणार नाही असे बोलले गेले. मात्र अखेरीस आज दांगडे यांची बदली करण्यात आली आहे. दांगडे यांच्याकड राज्य सरकारच्या पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार देण्यात आला आहे. दांगडे यांच्या जागेवर डॉ. इंदूराणी जाखड यांची वर्णी लागली आहे. जाखड या राज्य सरकारच्या महिला विकास विभागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे त्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार तसाच ठेवून त्यांच्या शिरावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी सरकारने सोपविली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत जे आयुक्त लाभले ते पाहता जाखड या प्रथमच महिला आयुक्त महापालिकेस लाभल्या आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका