शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

डोंबिवलीत अस्वच्छतेवरून आयुक्त दांगडे यांचा अधिकार्याना सज्जड दम; आयुक्तांची रात्रीत सरप्राईज व्हिजिट 

By अनिकेत घमंडी | Updated: October 19, 2022 14:26 IST

रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर परिसरात फेरीवाले नकोत

डोंबिवली: दिवाळीच्या अनुषंगाने परिसर स्वच्छ ठेवण्याकरीता २४ तास ऑनफिल्ड काम करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सर्व संबधित अधिकारी वर्गाला दिल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री अचानक दांगडे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराचा पाहणी दौरा केला, मात्र परिसरातील अस्वच्छता पाहून संबंधित प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना फैलावर घेत सर्वत्र स्वच्छता राखणे, वेळच्या वेळी कचरा उचलून घेण्याबाबत सज्जड ताकीद दिली.      

नगरी स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी कचरा वेळेत उचलून घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी, हॉटेलधारकांनी, दुकानदारांनी देखील त्यांचा कचरा रस्त्यावर वा इतरत्र न टाकता महापालिकेच्या घंटागाडीत देऊन शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन दांगडे यांनी या पहाणी दौ-या दरम्यान केले. 

कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ १५० मी. परिसरात फेरीवाले बसणार नाहीत, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. जर या ठिकाणी फेरीवाले आढळून आल्यास संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी/पथक प्रमुख यांच्यावर कारवाई केली जाईल , असा इशारा डॉ.दांगडे यांनी दिला.     

झोपडपट्टी परिसरात प्रामुख्याने महापालिकेच्या घंटागाड्या पोहोचत नाहीत, अशा ठिकाणचे लोक बाहेर कचरा टाकत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा कचरा रात्रीच उचलून घेण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे, तो कचरा सकाळी पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाईल अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.  त्यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, उपमुख्य स्वच्छता अधिकारी घुटे, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, सहा.आयुक्त दिनेश वाघचौरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या आधी देखील तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनीही अशीच रात्रीची भेट देत स्कायवॉकवरील फेरीवाल्यांवर कारवाई केली होती, तेव्हापासून साधारण वर्षभर फेरीवाले बसले नव्हते, पण आता पुन्हा रात्रीच्या वेळेत फेरीवाले बसायला लागले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :dombivaliडोंबिवली