शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयात वेळेवर या; वेळकाढुपणा चालणार नाही अन्यथा कारवाई अटळ

By प्रशांत माने | Updated: August 29, 2023 17:51 IST

केडीएमसी मुख्यालयासह सर्वच प्रभाग कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचा-यांच्या दैनंदिन हजेरीसाठी बायोमेट्रीक प्रणाली सुरू केली आहे.

कल्याण: केडीएमसी मुख्यालयासह सर्वच प्रभाग कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचा-यांच्या दैनंदिन हजेरीसाठी बायोमेट्रीक प्रणाली सुरू केली आहे. पण बहुतांश कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. जाणुनबुजुन कार्यालयात उशीरा येवून संध्याकाळी उशीरापर्यंत कार्यालयात उपस्थित असतात हे वर्तन वेळकाढूपणाचे असून असे आढळून आल्यास शिस्तभंगाची कारवाईस पात्र ठराल असा सज्जड इशारा आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी दिला आहे.

वर्ग १, २ व ३ मधील अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ अशी असून वर्ग ४ मधील कार्यालयीन कर्मचा-यांची वेळ सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० अशी निश्चित केली आहे. कोरोनात बायोमेट्रीक हजेरी बंद करण्यात आली होती. दरम्यान त्यानंतरही बराच कालावधीपर्यंत ती सुरू करण्यात आलेली नव्हती. त्या दरम्यान ‘कधीही यावे आणि कधीही जावे’ असे वर्तन अधिकारी, कर्मचा-यांकडून सातत्याने घडत होते. नागरीकांच्या याबाबतच्या वाढत्या तक्रारी पाहता मे महिन्यात मुख्यालयासह प्रभाग कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक हजेरी सुरू करण्यात आली आहे. परंतू बायोमेट्रीक हजेरी मशीन बसवून देखील अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे आयुक्त दांगडे यांच्या निदर्शनास पडताच त्यांनी परिपत्रक जारी करून हजेरीबाबत सूचना दिल्या आहेत. संबंधित व्यक्ती निश्चित केलेल्या वेळेनंतर हजर झाल्यास जेवढा वेळ उशिर झाला तेवढा वेळ संध्याकाळी कार्यालयीन काम करणे बंधनकारक राहील. अधिकारी, कर्मचा-यांच्या कार्यालयात येण्या-जाण्याच्या वेळेमध्ये सुधारणा होत नसल्यास संंबंधित अधिकारी कर्मचारी निलंबनासह गंभीर शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील असेही परिपत्रकात नमूद केले गेले आहे.हजेरी पडताळणी पथक अचानक देणार धडक

आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त तसेच बायोमेट्रीक हजेरी पडताळणी पथकातील कर्मचारी यांनी आकस्मिक पाहणी केल्यास व कर्मचारी कार्यालयात गैरहजर आढळून आल्यास,संबंधिताची बिनपगारी रजा गृहीत धरून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण