शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण बाजार समितीमधील फूल मार्केटमधील विक्रेत्यांकडून कोण करतोय वसूली?

By मुरलीधर भवार | Updated: May 23, 2023 17:58 IST

बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फूल बाजारातील विक्रेत्यांकडून १५०० रुपयांची वसूली केली जात आहे. या वसूली प्रकरणी बाजार समितीने हात वरती केले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांकडून वसूली कोण आणि कशाची करतोय असा संतप्त सवाल फूल विक्रेत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी एका फूल विक्रेत्या महिलने बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे.

कल्याण बाजार समितीच्या आवारात फूल मार्केट आहे. या फूल मार्केटमधील शेड धाेकादायक झाल्याने त्याठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम करण्याकरीता बाजार समितीच्या वतीने महापालिकेकडे प्रस्ताव मांडला होता. बाजार समितीकडून फूल विक्रेत्यांच्या शेड तोडण्यास विक्रेत्यांचा विरोध होता.

उच्च न्यायालयाने शेड तोडण्याचे आदेश दिल्याने बाजार समितीने सप्टेंबर २०२२ मध्ये शेड तोडण्याची कारवाई केली. तोडण्यात आलेल्या शेडमधील विक्रेत्यांना आवारात तात्पुरत्या शेडची पर्याची केली आहे. मात्र विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, बाजार समितीने विक्रेत्यांकडून वर्षभराचे भाडे घेतले आहे. वर्षभराचे भाडे हे १४ हजार रुपये आहे. भाडे घेण्याचा अधिकार बाजार समितीचा आहे. मात्र त्या व्यतिरिक्त विक्रेत्यांकडून काही मंडळी दीड हजार रुपये वसूल करीत आहे. या दीड हजार रुपयांची पावती विक्रेत्यांनी मागितली असता पावती देण्यास नकार दिला जात आहे. या प्रकरणी एका फूल विक्रेत्या महिलेने वसूली करणाऱ्याकडे पावतीची मागणी केली असता तिला शिवीगाळ करुन तिचा फूलाचा बाकडा फेकून दिला. या महिलेने बाजारपेठ पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाकडे विचारणा केली असता प्रशासनने हात वरती केले आहे. प्रशासनाकडून ही वसूली केली जात नसेल तर अशी बेकायदेशीर वसूली कोण करतोय हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या विरोधात पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई होणे अपेक्षित आहे अशी मागणी फूल विक्रेत्यांनी केली आहे. फूल मार्केटमधील शेड तोडल्याचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी हाेणे अपेक्षित आहे.

टॅग्स :kalyanकल्याण