शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत दीनदयाळ रस्ता, रिंग रोडचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:03 IST

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प : सरकारकडून मंजुरीची अधिसूचना

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : डोंबिवली पश्चिममधील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत मोठा गाव ठाकुर्ली ते रिंग रोडपर्यंतच्या रस्ता आणि रेल्वे क्रॉसिंग ते दीनदयाळ रोड या दोन रस्त्यांच्या मंजुरीची अधिसूचना राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढली आहे.दिवा-वसई या मार्गावर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प जात आहे. मोठा गाव ठाकुर्ली येथे रेल्वे क्रॉसिंग आहे. मोठा गाव ठाकुर्ली रेल्वे क्रॉसिंग ते रिंग रोडपर्यंतचा रस्ता विकास आराखड्यात १५ मीटर रुंदीचा होता. तो २४ मीटर रुंदीचा करण्यास मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर रेल्वे क्रॉसिंग ते दीनदयाळ हा ३०० मीटर लांबीचा रस्ता २४ मीटर रुंदीचा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील एक प्रस्ताव महापालिकेच्या महासभेने मंजूर केला होता. अंतिम मंजुरीसाठी तो राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे पाठविला होता. हा रस्ता झाल्याने रस्ता प्रशस्त होणार आहे. रिंग रोड आणि त्याला लागून मोठा गाव ठाकुर्ली ते माणकोली खाडी पूल तयार केला जात आहे. त्यासाठीही रिंग रोडकडे जाणारा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. रिंग रोड हा ३१ किलोमीटरचा लांबी आहे, तसेच मोठा गाव ठाकुर्ली ते दुर्गाडी हा रिंग रोड प्रकल्पातील तिसरा टप्पा आहे. त्याच्या कामालाही लवकर सुरुवात होणार आहे, अशी माहिती नगररचनाकार राजेश मोरे यांनी दिली आहे.

रिंग रोडही होणार सुसाटnरिंग रोड हा दुर्गाडी ते मांडा-टिटवाळा यादरम्यान १७ किलोमीटर अंतराचा असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होताच तो टप्प्याटप्प्याने महापालिकेस हस्तांतरित केला जाणार आहे. मात्र, या रस्त्यादरम्यान बाळकृष्ण पेपर मिल होती. nहा रस्ता मिलच्या जागेतून जात होता. हा रस्ता मिलच्या बाहेरून काढला जावा यासाठी कंपनी राज्य सरकारकडे अपिलात गेली होती, तसेच महापालिकेने त्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. राज्य सरकारने कंपनीच्या बाहेरून रस्ता काढण्यास मंजुरी देऊन तशी अधिसूचनाही काढली आहे. nत्यामुळे रिंग रोडचे कंपनीच्या टप्प्यातील रखडलेले काम मार्गी लागणार आहे. बाळकृष्ण पेपर मिल ही महापालिकेच्या हद्दीतील रोजगार देणारी पहिली मिल होती. त्यामुळे तिच्या जागेतून जाणारा रस्ता बायपास केला जावा, याच्या समर्थनार्थ महापालिका प्रशासनाही होते, अशी माहिती सहायक संचालक नगररचनाकार मा.द. राठोड यांनी दिली.