शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेवरील चिखलोली रेल्वे स्थानक लवकरच सेवेत; स्थानक उभारणीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती

By अनिकेत घमंडी | Updated: February 14, 2024 17:08 IST

७३.९२८ कोटी रुपयांच्या निधीतून होणार स्थानकाचे बांधकाम

डोंबिवली: मध्य रेल्वेवरील अंबरनाथ - बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांमध्ये नव्याने चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्थानक उभारणीसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ७३.९२८ कोटी रुपयांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. आता  स्थानकाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे.  खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,  आमदार डॉ. बालाजी किणीकर हे या स्थानकाच्या उभारणीसाठी सातत्याने आग्रही होते. त्यांचा पाठपुरावा सुरू होता.विष्णू प्रकाश पुंगलीया कंपनीला हे काम देण्यात आले असून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) कडून याबाबत कंपनीला स्वीकृती पत्र देखील देण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येचा भार पाहता या दोन्ही शहरांच्या मध्यस्थानी चिखलोली रेल्वे स्थानक असावे अशी गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिक नागरिकांची मागणी होती. रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी जमीन, स्थानक उभारणीसाठीच्या विविध टप्प्यांवरील मंजुरी अशा नानाविध अडचणींचा डोंगर पार करत चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम दृष्टीपथात आले आहे. यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार  शिंदे यांनी वेळोवेळी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार तसेच बैठका घेत पाठपुरावा केला होता. याचबरोबर स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर देखील यासाठी आग्रही होते. त्यांच्या या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चिखली रेल्वे स्थानकाची भरण्याची काम प्रत्यक्ष मार्गे लागले असून येत्या कालावधीत हे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे दोन्ही शहरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कायम गर्दी दिसून येत असते. याच पार्श्वभूमीवर दोन्ही शहरांच्या मध्यस्थानी चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्थानकाच्या उभारणीनंतर अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकावरील प्रवासी भार देखील कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.चिखलोली रेल्वे स्थानकात जिने, पुल आणि जमिनीच्या कामासाठी  रेल्वे प्रशासनाकडून ऑक्टोबर महिन्यात ८१.९३ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया मार्गी लागून स्थानकाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार होते. आता रेल्वे प्रशासनाकडून फलाट, शेड, पिलर, विद्युत वहिनी आणि इतर कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पार पडली असून लवकरच ७३.९२८ कोटी रुपयांच्या निधीतून स्थानक उभारणीचे प्रत्यक्ष काम आता सुरू होणार आहे. यासाठी सबंधित कंपनीला मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड कडून स्वीकृती पत्र देखील देण्यात आले आहे.गेल्या अनेक दशकांपासून चिखलोली रेल्वे स्थानकाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. लवकरच स्थानकाची उभारणी होऊ ते सेवेत येईल. त्याला लाखो रेल्वे प्रवाशांना फायदा होणार असून चिखलोली, अंबरनाथ आणि विस्तारीत बदलापुरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.-  डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा