शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, उल्हासनगर महापालिकेने केले १२० बसेसचे नियोजन

By सदानंद नाईक | Updated: October 5, 2024 19:51 IST

सभेच्या ठिकाणी ५ हजार महिला नेण्याचे टार्गेट महापालिकेवर असून त्यांच्या चहा-पाणी, नाष्टा व जेवणाची व्यवस्था महापालिका करणार आहे.

उल्हासनगर : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत वालावलकर मैदान घोडबंदर ठाणे येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जाण्यासाठी महापालिकेने १२० बसेसचे नियोजन केले. सभेच्या ठिकाणी ५ हजार महिला नेण्याचे टार्गेट महापालिकेवर असून त्यांच्या चहा-पाणी, नाष्टा व जेवणाची व्यवस्था महापालिका करणार आहे.

उल्हासनगर महापालिकेने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत अंगणवाडी सेविका व मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या ५ हजार लाभार्थी महिलाना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा स्थळी नेण्यासाठी १२० बसेसचे नियोजन केले होते. महापालिका प्रभाग अधिकारी व मुख्य अंगणवाडी सेविका यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. 

लाडक्या बहिनेच्या लाभार्थी महिलांना शहरातील विविध ठिकाणी बोलावून तेथून बसेसद्वारे ठाणे येथे सभेस्थळी त्यांनी नेले. शनिवारी सकाळी ९ वाजता अंगणवाडी सेविका व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना बोलाविण्यात आले होते. मात्र बसेस २ ते ३ तास उशिराने आल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या चहा-पाणी, दोन वेळा नाष्टा व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केली.

महापालिकेने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत शहरातील अंगणवाडी सेविका व मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थीना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी नेण्यासाठी १२० बसेसची व्यवस्था केली. त्यांना जेवण, नाश्ता व चहा-पाणी देण्यात येणार आहे. जिल्हातील सर्वच महापालिकेने असे नियोजन केले. - विकास ढाकणे (आयुक्त-उल्हासनगर महापालिका) 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर