शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मांडा व गोवेली परिसरात ३९ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल, २४ लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश

By अनिकेत घमंडी | Updated: October 10, 2022 15:52 IST

महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा व गोवेली परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे.

डोंबिवली: महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा व गोवेली परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या ३९ जणांविरूद्ध वीज कायदयांतर्गत मुरबाड पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. त्या आरोपींकडील २४ लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात महावितरणच्या पथकाला यश आले.

जगदीश दशरथ देशमुख राहणार म्हारळ, वरप, किशोर चव्हाण, संतोष सखाराम, काजल गुप्ता, विकी भालेराव, राजेंद्र बटपागड, राज सिद्धार्थ गस्टे, भुषण जाधव, दीपक भालेराव, मनिषा सुर्यवंशी, महेंद्र सुर्यवंशी, नागेश पैई, प्रिया शिंदे, संतोष गायकवाड, बारकू शिंदे, राहूल जखिरे, प्रकाश दिनकर, अब्बास शेख, बलराम नवशा बकुळे, झाकीर कुरेशी, संगिता प्रभू नाथ, सईरा अब्दूल लतिफ, गीता जयस्वाल, यास्मिन रगवी, भगवानदास गुप्ता, मोहम्मद इकलेक, अल्लाउद्दीन शेख, फिरोज जुबेदुल्ला साबा, सरफराज शोकीया, इसामाउद्दीन खान, श्रीमुर्ती मोर्या, अनवर उन्निसा, सुनिल मदनलाल गुप्ता, मीना पाल, सागर शाहा, सरफराज अहमद शाहा, वैशाली उबाळी, आकाश गायकवाड, सुनिल कुवड सर्व राहणार टिटवाळा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वच आरोपींनी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून व वीज मीटर टाळून परस्पर वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे.

उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता निलेश महाजन आणि कनिष्ठ अभियंता धनंजय पाटील त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणने केले.

टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवली