शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चोरीचे मोबाईल, बॅटरी विकायला आले आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडले!

By प्रशांत माने | Updated: August 15, 2024 17:01 IST

दोन सराईत चोरटे गजाआड: कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई.

प्रशांत माने/डोंबिवली लोकमत न्यूज नेटवर्क|डोंबिवली: उघड्या दरवाजावाटे भंगार दुकानातील मोबाईल फोन व वाहनाची बॅटरी चोरणा-या दोघा सराईत चोरटयांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. अनुराग सुनिल मंडराई (वय २०) आणि इरफान बाबु शेख (वय २२) दोघेही रा. डोंबिवली पूर्व अशी अटक केलेल्या चोरटयांची नावे आहेत. दोघेही सराईत चोरटे असल्याची माहीती गुन्हे अन्वेषणचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांनी दिली.

७ ऑगस्टला मध्यरात्री पुर्वेकडील सोनारपाडा परिसरातील एका भंगाराच्या दुकानात उघडया दरवाजावाटे घुसून चोरटयांनी पाच जणांचे मोबाईल आणि एका वाहनाची बॅटरी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता. कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग या गुन्हयाचा समांतर तपास करत असताना सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दोन जण चोरीचे मोबाईल व वाहनाची बॅटरी विक्री करण्यासाठी येणार आहे. या मिळालेल्या माहीतीनुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक भोसले, पोलिस हवालदार विश्वास माने, पोलिस नाईक दिपक महाजन, पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, उमेश जाधव, सतिश सोनवणे आदिंनी कल्याण शिळफाटा रोडवरील कोळेगाव परिसरात सापळा लावला. बातमीदाराने वर्णन केल्याप्रमाणे दोन व्यक्ती त्याठिकाणी येताच पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्याकडील सामानाची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे भंगाराच्या दुकानातून चोरी केलेले पाच मोबाईल आणि एका तीनचाकी वाहनाची बॅटरी आढळुन आली. दोघांकडून ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगारइरफान आणि अनुराग हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. इरफानवर मानपाडा, रामनगर आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचे १२ गुन्हे दाखल आहेत तर अनुरागवर देखील घरफोडीचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली