शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तुल विकायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला! जिवंत काडतुस देखील जप्त

By प्रशांत माने | Updated: March 28, 2024 15:20 IST

पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा एकुण २० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस पथकांची विशेष गस्त सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी डोंबिवली पूर्व भागात सापळा लावून देशी बनावटीचा गावठी पिस्तुल (कट्टा) बाळगणा-या आणि विक्री करण्यासाठी आलेल्या राजु हरीराम तिवारी ( वय ५३) रा. नवी मुंबई यास बुधवारी अटक केली. त्याच्याकडून पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा एकुण २० हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कल्याण गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दत्ताराम भोसले आणि पोलिस शिपाई गुरूनाथ जरग यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंबिवली पुर्वेकडील पाथर्ली रोडलगत, शेलार नाका, बीएसयुपी बिल्डींग परिसरात एकजण देशी बनावटीची गावठी पिस्तुल ( कट्टा) विक्री करण्यासाठी येणार आहे. या मिळालेल्या माहितीनुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, विश्वास माने, किशोर पाटील, पोलिस नाईक दिपक महाजन, पोलिस शिपाई गुरूनाथ जरग आदिंच्या पथकाने बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास सापळा लावून राजु तिवारीला अटक केली.

दरम्यान आरोपी तिवारी हा गावठी पिस्तुल कोणाला विक्री करण्यासाठी आला होता याची माहीती अदयाप गुलदस्त्यात आहे. कट्टा बाळगणे या आरोपाखाली स्थानिक टिळकनगर पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिवारी विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली