शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

ऐनवेळी प्लॅटफाॅर्म बदलल्याने दिव्यात लोकल धरली रोखून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2023 09:38 IST

संतप्त प्रवाशांनी घातला गोंधळ, कर्मचाऱ्यांनी काढली समजूत

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : दिवा रेल्वे स्थानकात ऐन गर्दीच्यावेळी बुधवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेने प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी दहा मिनिटांहून अधिक काळ लोकल रोखून धरली. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. अखेर प्रशासनाने प्रवाशांची समजूत काढल्यानंतर सेवा सुरळीत सुरू झाली. या वेळी स्थानकात प्रवाशांचा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान महिलेने रेल्वेची चेन खेचल्याने गाड्या खोळंबल्याचे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाने दिले.

सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत दिव्यातील नोकरदार रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर उभे होते. रोज मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल याच प्लॅटफॉर्मवर येते, मात्र आज ही लोकल ट्रेन येण्यास काही मिनिटे उशीर झाला. उशीर झालेली ट्रेननंतर दिवा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आली. चारवर येणारी लोकल ट्रेन दोनवर आल्याने प्रवाशांची मोठी धांदल उडाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर धाव घेतली. ट्रेन समोर उभे राहत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तसेच ही लोकल तब्बल १० ते १५ मिनिटे थांबवून ठेवण्यात आली. रेल्वे स्थानकात गोंधळ झाल्यानंतर आरपीएफ जवानांसह रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर प्रवासी रेल्वे रुळांवरून बाजूला झाले.

मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानेदिवा स्थानकात झालेल्या गोंधळानंतर रेल्वेची वाहतूक १५, २० मिनिटे उशिराने धावत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे जलद लोकल भांडूप स्थानकात थांबून होत्या. जलद मार्गावर भांडूप-नाहूर स्थानकादरम्यान काही तांत्रिक अडचणीमुळे २५ मिनिटांपासून लोकल थांबून होत्या. मुंबईकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या.

टॅग्स :localलोकल