शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आंबिवलीच्या टेकडीवर साकारणार बटरफ्लाट पार्क, ३ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 23:59 IST

सीएसआर फंडातून खर्च केले जाणार पैसे, आयुक्तांनी दिली भेट

ठळक मुद्देया प्रकल्पात बाधित होणा:या झाडय़ांच्या बदल्यात एक झाडामागे प्रत्येकी पाच झाडे आंबिवली टेकडीवरील ४० एकर जागेत लावण्याचा निर्णय घेतला होता.

कल्याण-आंबिवलीनजीक असलेल्या 40 एकराच्या टेकडीवर १५ हजार झाडे लावण्यात आली आहे. त्याठिकाणी सीएसआर फंडातून ३ कोटी रुपये खर्च करुन बटरफ्लाय, बी आणि बर्ड पार्क उभारले जाणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.आंबिवली टेकडीवरील या वनराईची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रख्यात फूलपाखरु तज्ञ आयसॅक केहीमकर, सुब्बलक्ष्मी, उद्यान अधीक्षक संजय जाधव, शहर अभियंत्या सपना कोळी देवनपल्ली आदी उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंग रोड प्रकल्प विकसीत करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात एका झाडामागे प्रत्येकी पाच झाडे आंबिवली टेकडीवरील ४० एकर जागेत लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टेकडीवर १५ हजार झाडे लावली आहे. त्यांना दररोज पाणी देऊन वाढविली आहे. तीन वर्षापूर्वी लावलेल्या झाडांचे संगोपन केल्याने त्याठिकाणी वनराई फुलली आहे. नेचर फाऊंडेशन आणि डीसीबी बॅकेच्या संयुक्त विद्यमाने सीएसआर फंडातून ३ कोटी रुपये खर्च करुन बटरफ्ला, बी आणि बर्ड पार्क उभारले जाणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. 

भोपर आणि उंभार्णी टेकडीवरही अशा प्रकारची योजना राबविण्याचा मानस आहे. याठिकाणी विविध जातीचे पक्षी येतात. त्यामुळे या ठिकाणी पक्षी निरिक्षणासाठी पक्षी प्रेमी येतील. याठिकाणी हे निसर्गरम्य ठिकाणी आंबिवली टेकडी भविष्यात विकसीत होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. केवळ आंबिवली टेकडीच नाही.  वनराई फुललेली नाही. तर महापलिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत गौरी पाडा येथे विकसीत करण्यात येत असलेल्या सिटी पार्कच्या प्रकल्पाच्या ठिकाणीही विविध जातीची ३ हजार झाडे लावली जाणार आहे.

फुलपाखरु तज्ञ केहीमकर यांनी सांगितले की, या ठिकाणी जे बटरफ्लाय, बी आणि बर्ड पार्क सुरु केले जाणार आहे. त्यासाठी पुरक झाडे लावली जाणार आाहेत. पक्षांना आकर्षित करणारी झाडे लावली जाणार आहेत. त्यात भारतीय झाडे जास्त प्रमाणात लावण्यात येणार आहेत. लोक मलेशिया आणि थायलंड येथे बटरफ्लाय पार्क पाहण्यासाठी जातात. त्यांना थायलंड आणि मलेशियाला जाण्यासाठी गरज भासणार नाही. त्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाचे हे नैसर्गिक बटरफ्ला, बी आणि बर्ड पार्क विकसीत होईल. 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका