शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत इमारतींमधील १० हजार घरांच्या नोंदणीसाठी बिल्डर सक्रिय, केडीएमसीत १२० बिल्डरांची बैठक : इलेक्शन फंडाचे आमिष

By अनिकेत घमंडी | Updated: September 2, 2023 04:47 IST

महापालिकेत काही मोजक्या नगरसेवकांची गोल्डन गँग होती. सगळी आर्थिक गणिते तीच फिरवत होती, आता नगरसेवक नसल्याने  बिल्डरांनी आमदारांच्या सहकार्याने आपल्या मागण्या रेटण्यास सुरुवात केली आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामे उभी करणाऱ्या १२० बिल्डरांची येथील एका नेत्यासोबत गुरुवारी बैठक झाली. २०१८-१९ मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर अल्पावधीसाठी अनधिकृत इमारतींमधील फ्लॅटचे रजिस्ट्रेशन सुरू केले होते. आता पुन्हा निवडणुकांचे वातावरण पाहता पुन्हा अल्पावधीकरिता रजिस्ट्रेशन सुरू करावे, असा प्रस्ताव या बिल्डरांनी मांडला आहे. 

जर खरोखर ही मागणी मान्य झाली तर हजारो बेकायदा फ्लॅटचे रखडलेले रजिस्ट्रेशन होणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाण-घेवाण करण्याची तयारी बिल्डरांनी दर्शविली आहे. काही राजकीय पक्ष इलेक्शन फंड म्हणून या प्रस्तावाकडे पाहत असल्याची कुणकुण आहे. 

महापालिकेत काही मोजक्या नगरसेवकांची गोल्डन गँग होती. सगळी आर्थिक गणिते तीच फिरवत होती, आता नगरसेवक नसल्याने  बिल्डरांनी आमदारांच्या सहकार्याने आपल्या मागण्या रेटण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी १ लाख ६० हजार अनधिकृत बांधकामे असून, त्या बांधकामांचा प्रश्न महापालिका सोडवू शकलेली नाही. त्यामुळे न्यायालय वेळोवेळी महापालिका आयुक्तांना फटकारते.कल्याण पश्चिम, पूर्व, टिटवाळा, डोंबिवली पूर्व पश्चिम, २७ गाव परिसर आदी सर्व ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याचे महापालिका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करते. याचाच अर्थ महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकाम आहेत.

रजिस्ट्रेशनवरील बंदी उठविण्याचा प्रस्ताव सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्याकडील गुरुवारच्या बैठकीला १२० अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर उपस्थित होते. सुमारे १० हजार घरांचे रजिस्ट्रेशन करण्याकरिता निवडणुकीच्या तोंडावर रजिस्ट्रेशवरील बंदी उठवा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. रजिस्ट्रेशन सुरू केले तर सरकारला महसूल मिळेल, असे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात प्रत्येक घरामागे मोठी रक्कम हा निर्णय घेणाऱ्यांना देण्याची तयारी बिल्डरांनी दाखविली आहे.

घरांच्या किमती गगनाला अधिकृत घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने सामान्य गोरगरीब माणूस  कमी किमतीत अनधिकृत इमारतीमधील घर खरेदी करतो. आकर्षक जाहिरातींना बळी पडतो. एकदा घर विकून झाल्यावर बांधकाम व्यावसायिक जबाबदारी घेत नाहीत. घराचे रजिस्ट्रेशन न झाल्याने ग्राहकाला ते घर विकता येत नाही. आपली फसवणूक झाल्याचे रहिवाशांना समजते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका