शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

कुटुंबावर पाच वर्षे बहिष्कार; जमिनीच्या वादातून पंचांनी उचलले पाऊल

By सचिन सागरे | Updated: June 2, 2023 09:19 IST

व्यवसाय ठप्प,आर्थिक कोंडी

सचिन सागरेकल्याण : गावात लग्नकार्यात आता त्यांना बँड वाजवायला कुणी बोलावत नाही. मासेविक्रीच्या व्यवसायासाठी मुंबईतून मासे आणायला जाताना गावातील लोक सोबत घेत नाहीत. त्यांच्या  मुलांना गावातील मुले खेळायला घेत नाहीत. असे जगणे कल्याण पश्चिमेतील कोळीवाड्यात राहणारे प्रकाश विष्णू भोईर (६७) व त्यांचा लहान भाऊ विजय भोईर (६५) यांचे  कुटुंब २०१८ पासून म्हणजेच पाच वर्षांपासून जगत आहे.   यातून मार्ग काढण्यासाठी विनविण्या केल्या, पण काहीच उपयोग न झाल्याने हे कुटुंबीय मानसिक व आर्थिक विवंचनेत आहेत. 

मालकीच्या व वहिवाटीच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाचा कायदेशीर मार्गाने विरोध केल्याने हा बहिष्कार घातल्याचे भोईर कुटुंबाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे बहिष्कार घालण्यात आला नसल्याचे पंच कमिटी म्हणते.

पंच कमिटीच्या प्रमोद किसन भगत व राम गजानन भोईर यांच्यासह सदस्यांनी बहिष्कार टाकल्याचा अर्ज बाजारपेठ पोलिस तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तृप्ती पाटील यांना दिला होता, . त्यानंतर, आमच्यासह पंच कमिटीची एकत्रित बैठक बोलावली. मात्र, पंच कमिटीने बंदी उठविण्याचे पोलिसांना दिलेले आश्वासन काही दिवसांपुरतेच राहिले. पुन्हा त्रास सुरू झाल्याचे भोईर म्हणाले. 

समाजाच्या ट्रस्टच्या मंदिराच्या जागेचा प्रश्न जोडून गावातील लोकांची दिशाभूल केली जात आहे. बहिष्काराची तक्रार पोलिसांकडे करू नये म्हणून पंचांसह त्यांचे हस्तक आमच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात खोट्या तक्रारी करीत आहेत. मुलाच्या लग्नासाठी गावातील एकही जण आला नाही. यावेळी आमच्या घरावर दगडफेकही झाली होती.विजय भोईर 

याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी बाजारपेठ पोलिसांना मी व उत्तम जोगदंड यांनी २०२१ मध्ये सांगितले होते. परंतु, त्यावेळी पंच आणि पीडित कुटुंबांची एकत्र बैठक घेऊन बहिष्काराचा प्रश्न मिटवला होता. सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या पंचांवर गुन्हा दाखल न झाल्याने त्यांना धाक नाही.     वकील तृप्ती पाटील, अंनिस, कायदा विभाग सहसचिव.

जमिनीचा वाद निर्माण झाला होता. मात्र, हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला आहे.देवानंद भोईर, उपनेते, कोळी महासंघ राज्य

भोईर कुटुंबीयांवर बहिष्कार टाकलेला नाही. गावातील सर्व कार्यक्रम आणि पालखी आणि भजनातही त्यांचा सहभाग असतो.प्रमोद किसन भगत, अध्यक्ष, पंच कमिटी.

भोईर कुटुंबीयांचे आरोप खोटे आहेत. त्यांना गावातील सर्व कार्यक्रमांत बोलावले जाते. तसेच, त्यांच्या सुख-दु:खात गावकरी सहभागी होत असतात.राम भोईर, सदस्य, पंच कमिटी

या प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाकडे पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सागितले. दरम्यान, हे प्रकरण काही दिवसांपूर्वी सामोपचाराने सोडविण्यात आल्याचे बाजारपेठ पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :kalyanकल्याण