शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपये देऊन घर तर घेतले; पण  ना प्यायला पाणी, ना जायला रस्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 10:33 IST

वसाहतीतील पाणीप्रश्न गंभीर

- मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण - शीळ रोडलगत टाटा नाकानजीक मोठी गृहसंकुल वसाहत आहे. या वसाहतीत १९ इमारती आहेत. या १९ इमारतीत १३४० सदनिका आहेत. या १३४० सदनिकाधारकांना कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे या नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. या वसाहतीमधील घरे बिल्डरने २००७ मध्ये बांधली. या घराचा ताबा ग्राहकांना दिला गेला. त्यानंतर गृह निर्माण सोसायटी २०१० मध्ये अस्तित्वात आली. 

  या मोठ्या वसाहतीचा परिसर यापूर्वी कल्याण ग्रामीण भागात होता. २७ गावेही महापालिकेत समाविष्ट नव्हती. त्यामुळे या परिसराला ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जात होता. हा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून केला जातो. आता ही वसाहत आणि २७ गावे ही महापालिकेत आहे. त्यामुळे या वसाहतीला पाणी देणे, ही जबाबदारी महापालिकेची आहे.  एमआयडीसीने पाण्याचा कोटाही वाढविला आहे. एमआयडीसीकडून केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचा दाबही कमी असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. 

घरे महाग; पण ना रस्ते; ना पाणीदहा वर्षांपूर्वी वन रूम किचन बेडरूमकरिता २० ते २२ लाख रुपये मोजले होते. टू रूम वन रूम किचन बेडरूमकरिता ३५ लाख रुपये मोजले होते. घर महाग मिळाले. मात्र ना रस्ते ना पाणी. 

पावसाळ्यात पायी चालणे कठीणरस्ते व्यवस्थित नसल्याने पावसाळ्यात रस्ते चिखलमय असतात. त्यातून वाट काढत नागरिकांना मार्गक्रमण करावे लागते.

नालेही नाहीतसोसायटीच्या सांडपाण्यासाठी नाल्याची व्यवस्था नाही. त्यामुळे सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही. 

घाण पाणीही रस्त्यावरसोसायटीच्या मागच्या बाजूला ड्रेनेजचे पाइप नसल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहते. त्याचा नागरिकांना त्रास होतो.

टँकरवर महिन्याला २५ हजाराचा खर्च४० सदनिकांची एक इमारत आहे. या ४० सदनिकाधारकांना टँकरने पाणी मागवावे लागते. त्यासाठी महिन्याला २० ते २५ हजार रुपये खर्च होतात.

समस्या जैसे थेसोसायटीला संरक्षक भिंत नाही. तसेच पथदिव्यांची व्यवस्था नाही.     -चेतन चव्हाण, रहिवासी.

सोसायटीच्या पाणी समस्येविषयी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, कायमस्वरूपी समस्या सुटलेली नाही.     -अमरसिंग चव्हाण, रहिवासी.

या वसाहतीला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बूस्टर पंप बसविला आहे. मध्यंतरी एमआयडीसीकडूनच पाणीपुरवठा कमी केला जात होता. कारण जलवाहिनी फुटली होती. आठ दिवस पाण्याची समस्या होती.     -किरण वाघमारे, अभियंता, 

टँकरवर महिन्याला २५ हजाराचा खर्च४० सदनिकांची एक इमारत आहे. या ४० सदनिकाधारकांना टँकरने पाणी मागवावे लागते. त्यासाठी महिन्याला २० ते २५ हजार रुपये खर्च होतात.    पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी. 

टॅग्स :kalyanकल्याण