शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तासंतास वेटिंगवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:14 IST

शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीवर ताण 

अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : काेराेना काळात रुग्णालयात बेड मिळवताना दमछाक हाेत असतानाच आता मरणानंतरही अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत तासन् तास प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे नातेवाइकांचे हाल हाेत असून या प्रतीक्षेमुळे मरणयातना भाेगाव्या लागत असल्याचे चित्र स्मशानभूमीत दिसत आहे. शहरात पाच स्मशानभूमी आहेत. त्यात शिवमंदिर स्मशानभूमीत चांगल्या सुविधा आहेत. पश्चिमेतील मोठा गाव, कुंभारखान पाडा या ठिकाणी सुविधांअभावी काेणी जाण्यास फारसे उत्सुक नसते. त्यामुळे पूर्वेतील शिवमंदिर स्मशानभूमीवर ताण पडत आहे.पाथर्ली, ठाकुर्लीतील चोळेगाव येथेही अशीच स्थिती आहे. सध्या कोविड रुग्णांचे मृत्यू वेगाने वाढले आहेत. शिवमंदिर येथील स्मशानभूमीत लाकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ९ जागा आहेत. त्यामुळे एका वेळी ९ जणांवर विधी होऊ शकतो. अनेक मृतदेहांना तासन् तास वाट पाहावी लागत आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता सहा मृतदेह होते. त्यापैकी चार वेटिंगवर होते. मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, सकाळी ७ वाजता येऊन नंबर लावला आहे. मात्र, दुपारी १ वाजला तरीही सरण तयार नव्हते. अंत्यसंस्कारांसाठी टोकन पद्धत सुरू केली आहे, मात्र त्यात बराच सावळागोंधळ  असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी रात्रीपासून दुपारपर्यंत  आठ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगितले. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तेथे पालिका प्रशासनाने लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्रस्त नातेवाइकांनी केली. 

गॅसदाहिन्या बंदच पाथर्ली येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनीची सोय आहे. मात्र ती बंद असल्यामुळे पाथर्ली येथे कोणी गेले नाही. तेथील मृतदेह शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानात आले. त्यामुळे तेथील ताण आणखी वाढला आहे.

महापालिकेचे स्मशानभूमी देखभाल अधिकारी शमीम केदार म्हणाले की, त्या दाहिन्या दुरुस्तीसाठी कुर्ला येथून कारागीर बोलावले आहेत. दोन्ही ठिकाणच्या बेल्टमधील बेअरिंग खराब झाल्यात. त्या बेल्टवर मृतदेहांवरील पीपीई किटचे प्लास्टिक अडकते. आगीत ते जास्त वितळते, त्यामुळे बेल्ट पुढे जात नाही. या तांत्रिक समस्येमुळे दाहिन्या बंद आहेत़ त्या लवकरच सुरू हाेतील.

शिवमंदिर स्मशानभूमीत लाकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी २,५०० रुपयांची पावती फाडायची, डिझेलसाठी ५०० रुपये, ३०० रुपये शेणाच्या गाेवऱ्या, अन्य सामग्री व लाकडे रचण्यासाठी मृतांच्या नातेवाइकांना काही रक्कम द्यावी असल्याचा आराेप हाेताे.