शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाकडून भाजपचे खच्चीकरण केले जात असल्याचा भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

By मुरलीधर भवार | Updated: September 12, 2023 17:32 IST

पुन्हा विकास कामांच्या मुद्यावरुन सोशल मिडियावर आमदार गायकवाड यांना शिदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी लक्ष्य केले.

कल्याण- शिंदे गटापुढे भाजपचे काही चालत नाही असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यांच्या या टिकेपश्चात कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आमदार पाटील यांनी केलेल्या टिकेला दुजाेरा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप भाजप आमदार गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या आरोपानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपमध्ये पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही दिवसापूर्वी भाजपचे पदाधिकाऱ्याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुद्यावरुन भाजप आक्रमक झाली होती. त्यानी मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षकांची बदली करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिस अधिकाऱ्याला शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप भाजपने केला होता.

या वादानंतर भाजपने खासदार शिंदे यांना लोकसभा निवडणूकीत सहकार्य न करण्याचा ठराव भाजपच्या बैठकीत मंजूर केला. या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला होता. त्यानंतर हा वाद मिटला. मात्र त्यानंतर पुन्हा विकास कामांच्या मुद्यावरुन सोशल मिडियावर आमदार गायकवाड यांना शिदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी लक्ष्य केले होते. त्यांचा सोशल मिडियावरील वाद इतका विकोपाला गेला की, दोघांनी खुल्या चर्चेसाठी तयारी दाखविली. मात्र दोघेही एकमेकांसमोर येणार होते. त्याच वेळी पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चर्चेच्या ठिकाणी येत असलेल्या शहर प्रमुख गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिंदे गटाने पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. हा वाद शांत नाही. तोच आमदार गायकवाड यांनी शिंदे गटाकडून भाजपचे खच्चीकरण सुरु असल्याचा आरोप केल्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.