शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... तुम्हीही होऊ शकता शिकार, बतावणी करीत लुटला जातोय ऐवज!

By प्रशांत माने | Updated: April 9, 2023 18:58 IST

साधारण ५० वर्षापुढील तसेच वृद्ध व्यक्तींना लक्ष केले जात असल्याचे घडलेल्या घटनांमधून स्पष्ट होत आहे.

डोंबिवलीः एकिकडे कल्याण डोंबिवलीत मध्यरात्रीसह दिवसा घरफोडीचे प्रकार वाढले असताना दिवसाढवळया गजबजलेल्या ठिकाणी संमोहित तसेच बोलण्यात गुंतवून भामट्यांकडून नागरिकांच्या अंगावरील  दागिने हातचलाखीने लांबविले जात आहेत. आठवडयाभरात चार घटना अशा घडल्या असून यातील तीन घटना  डोंबिवलीतील आहेत. साधारण ५० वर्षापुढील तसेच वृद्ध व्यक्तींना लक्ष केले जात असल्याचे घडलेल्या घटनांमधून स्पष्ट होत आहे.

दोघांनी दुचाकीवरून येऊन सोनसाखळी हिसकावून पलायन करण्याच्या घटनांनी महिला वर्गात असुरक्षिततेची भावना असताना आता  गजबजलेल्या रहदारीच्या ठिकाणी पुरुष तसेच वृद्ध देखील सुरक्षित नाहीत हे आठवड्यात घडलेल्या घटनांमधून समोर आलेय. कल्याण पश्चिमेकडील डिएचएल कंपनीचे कार्यालयासमोर बस स्टॉपवर अरविंद बागल ( वय ६२) हे बसची वाट पाहत होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती तिथे आल्या आणि काका एवढे सोन्याचे दागिने घालू नका असे बोलण्यात गुंतवले आणि बागल यांच्या अंगावरील   ४६ हजाराचे दागिने हातचलाखीने लंपास केले. ही घटना ३१ मार्चला घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. उर्वरीत तीन घटना डोंबिवलीत घडल्या आहेत.

डोंबिवली पुर्वेकडील रामनगर हद्दीत ३ आणि ४ एप्रिलला अनुक्रमे  हनुमंत गोसावी (वय ५६) आणि अनिल तांबे (वय ७२) यांना बोलण्यात गुंतवून तसेच संमोहित करीत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने दोघा भामट्यांकडून लांबविण्यात आले. या  घटना शहीद भगतसिंग मार्ग आणि टिळकचौकात सकाळी पावणेअकरा ते दुपारी साडेबारा दरम्यान घडल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेला राजन खोत या ६१ वर्षीय वृद्ध व्यक्तीला लुबाडण्यात आल्याची घटना ३ एप्रिललाच घडली. त्यांच्याकडील दोन लाखांचा सोन्याचा ऐवज दोघा भामट्यांनी हातचलाखीने लांबविला. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

पोलिस असल्याची बतावणी करीत याआधी सर्रासपणे लूटले जायचे. आमच्या शेठला मुलगा झाला आहे तो गरीबांना साडया वाटतोय गरीब दिसण्यासाठी अंगावरील दागिने काढून ठेवा, पुढे खून झालाय पोलिसांची नाकाबंदी चालू आहे दागिने काढून ठेवा अशा बतावण्या करीत लुटले जायचं. गोंधळात टाकून लक्ष विचलित करुन लुबाडण्याचे प्रकार सर्रास सुरु झालेत. बतावणी करणारा भामटा इतका आत्मविश्वासाने बोलतो की त्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवून नागरिक फसवणूकीला बळी पडत असल्याचे घडणाऱ्या घटनांमधून समोर येत आहे.